बिहार - बिहारमध्ये व्रतवैकल्याच्या उपवासानंतर गंगेत स्नान करत असलेल्या महिलेवर गँगरेप करून तिचा व्हिडिओ सोशलवर व्हायरल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. महिला गंगा नदीमध्ये अंघोळ करत होती, यादरम्यान तिच्यावर गँगरेप करण्यात आला. ही लज्जास्पद घटना मोकामाच्या जलगोविंद गावातील आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर देशभरात खळबळ उडाली आहे.
असे आहे प्रकरण..
याप्रकरणी दोन्ही आरोपी- शिवपूजन महतो आणि विकास यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शिवपूजन हा बसचालक आहे. व्हायरल व्हिडिओत महिला आरोपींना आपल्या व्रताची आणि गंगामातेची शपथ देताना दिसत आहे.
याप्रकरणी दोन्ही आरोपी- शिवपूजन महतो आणि विकास यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शिवपूजन हा बसचालक आहे. व्हायरल व्हिडिओत महिला आरोपींना आपल्या व्रताची आणि गंगामातेची शपथ देताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, महिला आरोपींना आरेडून म्हणतेय की, 'गंगा माई के किरिया भैया, पर्व कैले हियो, सहल हियो, छोड द.' तथापि, आरोपींवर याचा काहीएक परिणाम झाला नाही.
घटनेच्या वेळी महिला नदीत अंघोळ करत होती. यादरम्यान एक आरोपी विवस्त्र होऊन तेथे गेला. दुसऱ्या आरोपीने त्याला महिलेला उचलून आणण्यास सांगितले.
आरोपीने महिलेला शिवीगाळ करून गप्प राहण्याची धमकी दिली. यानंतर नदीच्या किनाऱ्यावर आणि नदीतही महिलेवर गँगरेप केला.
नितीशराजमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ...
बिहारमध्ये मागच्या काही महिन्यांपासून महिलांविरुद्ध लैंगिक हिसे मोठ्या प्रमाणावर घडत असून हा मुख्य राजकीय मुद्दा बनलेला आहे. मुजफ्फरपूरच्या बालिकागृह कांडमध्ये सरकारवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली होती.
मागच्या काही महिन्यांपासून महिलांच्या छेडछाड व बलात्काराचे शेकडो व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. विरोधी पक्षाचे नेते यासाठी सरकारच्या नाकर्तेपणाला जबाबदार ठरवतात.
विरोधक म्हणतात की, महिलांविरुद्ध हिंसेबद्दल सरकार कडक कारवाई करत नाही. यामुळे आरोपींचा आत्मविश्वास वाढत आहे. आणि अशा घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.
या घटनेने पुन्हा एकदा नितीश सरकारमध्ये महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सध्या या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया देण्यास पोलिस टाळाटाळ करत आहेत.
Post a comment