जयपूर (राजस्थान) - अलवरच्या भीषण सामूहिक हत्याकांडाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या घटनेत प्रेम अन् धोक्याची अतिशय खळबळजनक कहाणी समोर आली. आरोपींच्या अटकेनंतर नवनवे रहस्य समोर येत गेले. पती, 3 मुले आणि पुतण्याचा खून करणारी पत्नी संतोष शर्माने अटकेपासून वाचण्यासाठी अनेक डावपेच खेळले. तिची चौकशी सुरू असताना तिने पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर पोलिसांच्या तत्पर तपासामुळे या घटनेचा खुलासा झाला. पत्नी संतोषनेच आपल्या प्रियकरासह मिळून 5 जणांचा खून घडवला होता.
प्रेमप्रसंग... अन् 5 खून...
- मृत बनवारीची पत्नी संतोषचे हनुमान प्रसाद जाटशी प्रेमसंबंध सुरू होते. त्यांच्या प्रेमप्रसंगात संतोषचा मोठा मुलगा मोहित हा अडसर बनला होता. कारण त्याने दोघांना एकत्र पाहिले होते.
- संतोष आणि हनुमानला लग्न करायचे होते. मुलांचा अन् नवऱ्याचा काटा काढण्यासाठी तिने प्रियकरासह कट रचला होता. यानुसार 2 ऑक्टोबरच्या रात्री हनुमान हा सुपारी किलर दीपक व कपिल धोबी यांना घेऊन शिवाजी पार्कमध्ये आला.
- संतोषने खोलीचे दार उघडले. याआधीच तिने घरच्यांना जेवणात गुंगीचे औषध कालवून खाऊ घातले होते. यामुळे सर्वजण निश्चेष्ट झोपले होते. तिन्ही गुन्हेगारांनी घरात घुसून बनवारी, 3 मुले आणि पुतण्याची चाकूने भोसकून हत्या केली आणि फरार झाले होते. या भयंकर घटनेने आजही कॉलनीतील लोकांचा थरकाप उडतो. तर आरोपी महिला व तिचा प्रियकर दोघेही गजाआड झालेले आहेत.
प्रियकराने उलगडले सर्व रहस्य, पोलिसांना सांगितले कसे भेटले होते दोघे...
- विवाहिता तिचा प्रियकर हनुमान प्रसाद जाटच्या अटकेनंतरही खुनात सहभाग असल्याचे नाकारत होती.
- तर महिलेचा प्रियकर हनुमानने पोलिसांना या प्रकरणाशी निगडित सर्वकाही सांगून टाकले.
- पोलिसांना हनुमान म्हणाला की, अडीच वर्षांपूर्वी दोघे भेटले होते. आणि दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले.
- परंतु एका दिवशी संतोषचा मोठा मुलगा मोहितने (वय 17) या दोघांना एकत्र आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले.
- ही गोष्ट मोहित त्याचे वडील बनवारीलाल यांना सांगणार होता. आपले सीक्रेट कळल्याने संतोषने तिचा प्रियकर हनुमानसह मिळून सामूहिक हत्याकांडाचा कट रचला.

सुपारी किलरला पाहताच रडायला लागली संतोष
- आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पत्नीसमोर पोलिस अधिकाऱ्यांनी सुपारी किलर दीपक धोबी, कपिल धोबीला उभे केले, त्यांना पाहताच ती ओक्साबोक्शी रडायला लागली.
- यानंतर पोलिसांनी 5 जणांच्या निर्घृण हत्याकांडात अटक केलेल्या मृत बनवारीची पत्नी संतोष, तिचा प्रियकर हनुमान प्रसाद जाट आणि सुपारी किलर दीपक व कपिल धोबी यांना कोर्टात हजर करून नंतर तुरुंगात डांबले..

पोलिस म्हणतात...
- शिवाजी पार्कचे पोलिस अधिकारी विनोद सामरिया म्हणाले की, 2-3 ऑक्टोबरच्या रात्री शिवाजी पार्कच्या खोली क्रमांक 4/54 मध्ये किरायाने राहणाऱ्या बनवारी लाल शर्मा, त्यांचा मुलगा मोहित, हॅपी, अज्जू आणि पुतण्या निक्की यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता.
- यानंतर पोलिसांनी खुनात वापरलेले धारदार हत्यार आणि इतर साक्षीपुरावे गोळा केले.

Post a comment