-
जयपूर- रेल्वे मंडळाने तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून १७९५० रुपये देण्याची तयारी केली आहे. ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे एस. जी. मिश्रा यांनी सांगितले, मंडळाने सुरुवातीला ७५ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता ७८ दिवसांचा बोनस मिळेल.
यासाठी विशेष बिल पारित करून एका दिवसात कर्मचाऱ्यांच्या थेट खात्यांत पैसे जमा केले जातील. रेल्वे कर्मचारी संघटनेचे सुभाष पारिख यांनी सांगितले, उत्पादकतेच्या आधारे (पीएलबी) हर बोनस मिळेल. गेल्या वर्षी ३५०० रुपयांची मर्यादा वाढवून ७००० रुपये करण्यात आली होती. त्यामुळे बोनस अधिक मिळेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment