काय आहे प्रकरण?
कॅथरीन मेयोर्गा (34) या मॉडेलने पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर रोनाल्डो (33) वर बलात्काराचा आरोप लावला आहे. 2009 मध्ये अमेरिकेतील हॉटेलात ही घटना घडली असा दावा तिने केला आहे. लास वेगास येथील एका हॉटेलात आपली रोनाल्डोशी भेट झाली होती. परंतु, त्याने आपल्या स्टारडमचा गैरफायदा घेत हॉटेलच्या रुमवर बोलावून बळजबरी बलात्कार केला असे आरोप कॅथरीनने लावले आहेत.
त्याचवर्षी झाली होती सेटलमेंट, मग आता आरोप का?
रोनाल्डोवर बलात्काराचे आरोप लावणाऱ्या कॅथरीनने सांगितले, की 2009 मध्येच तिने या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु, त्यामध्ये आरोपीचे नाव आणि तपशील देण्यात आला नव्हता. रोनाल्डो एक मोठा सेलिब्रिटी असल्याने भीती वाटली आणि त्यामुळेच त्याचे नाव दिले नव्हते असा दावा तिने केला. यानंतर रोनाल्डोच्या वकिलांनी कथितरित्या कॅथरीनशी संवाद साधला आणि रोनाल्डोने माफी मागून सेटलमेंट करून घेतली. त्या करारात कॅथरीनला 3.75 लाख अमेरिकन डॉलर देऊन तोंड बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. परंतु, या घटनेच्या 9 वर्षांनंतर #MeToo कॅम्पेनने आपल्याला प्रेरणा दिली आणि पुन्हा खटला दाखल करत आहोत असे कॅथरीनने म्हटले आहे.
काय म्हणाले पोलिस?
लास वेगास पोलिसांनी 2009 मध्ये संबंधित मॉडेलने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तसेच तिची वैद्यकीय चाचणी सुद्धा करण्यात आली होती असे पोलिसांनी सांगितले आहे. परंतु, त्या तक्रारीमध्ये रोनाल्डोच्या किंवा इतर कुठल्याही आरोपीच्या नावाचा उल्लेख नव्हता. आता या महिलेने नव्याने तक्रार दाखल केल्याने प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले
Post a comment