बॉलिवूड डेस्क - होय, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांनीही संयुक्तरित्या आपल्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर रविवारी पोस्ट केली. त्यानुसार, 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी हे दोघे विवाह करणार आहेत. "कुटुंबियांच्या स्नेहाशीर्वादाने आम्हाला हे कळविण्यात आनंद होत आहे की आमचा विवाह 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी निश्चित झाला आहे." असे लिहिताना दोघांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सर्वच चाहत्यांचे आणि मित्र-परिवाराचे आभार मानले आहे.
विरुष्काच्या लग्नापासूनच होती या दोघांची चर्चा...
सोशल मीडियावर अपलोड होताच त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली. गतवर्षी डिसेंबरमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह झाला. तेव्हापासून या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला अशी चर्चा उडाली. या दरम्यान त्यांनी गुपचूप लग्न केले असेही ऐकण्यात आले होते. परंतु, आता रणवीर आणि दीपिकानेच आपल्या सोशल मीडियावरून आपल्या लग्नाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करून सर्वच चर्चांना विराम लावला आहे.-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment