0
  • इंटरनॅशनल डेस्क - रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी 8 महत्वाचे करार केले. त्यामध्ये S400 डिफेन्स सिस्टिमचा करार सर्वात महत्वाचा आहे. या दौऱ्यात पीएम नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या चर्चेतील काही क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळी पीएम मोदी पुतिन यांना आपल्या हातातील मोबाईलमध्ये एक व्हिडिओ दाखवत होते. हा व्हिडिओ पुतिन इतके लक्षपूर्वक पाहत होते, की त्यांनी पापणी सुद्धा हलवली नाही. हा व्हिडिओ परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी शेअर केला.


    नेमके काय होते व्हिडिओमध्ये?
    लंच सुरू असताना दोन्ही नेते आपसात चर्चा करत होते. त्याचवेळी मोदींनी त्यांना मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवला. हा व्हिडिओ रशियन कलाकारांनी तयार केला. त्यामध्ये रशियन गायिका महात्मा गांधी यांचे प्रिय भजन वैष्णव जन तो... गात होती. हा व्हिडिओ व्लादिमीर पुतिन अतिशय लक्ष देऊन पाहत होते. त्यावेळी हॉलमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वरजा सुद्धा होत्या. हा व्हिडिओ रशियन कलाकार सती काझानोव्हा (Sati Kazanova) हिने तयार केला आहे. त्यामध्ये वाद्य सुद्धा रशियन कलाकारांनी वाजवले आहेत. तर आवाज सती काझानोव्हा हिचा आहे.

    कोण आहे सती काझानोव्हा
    सती काझानोव्हा (Sati Kazanova) रशियातील प्रसिद्ध मॉडेल, अॅक्ट्रेस आणि सिंगर आहे. तिने स्वतः देखील आपल्या खासगी इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर पंतप्रधान मोदी आणि पुतिन हा व्हिडिओ पाहत असतानाची क्लिप सुद्धा सोशल मीडियावर ....

Post a comment

 
Top