0
 • एंटरटेनमेंट डेस्क - चित्रपट इंडस्ट्रीतील भाई म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानने अनेक कलाकारांच्या करिअरला नवे वळण दिले आहे. कित्येक फ्लॉप अभिनेत्यांना त्याने सुपर हिट चित्रपट मिळवून दिले. कतरिना कॅफ, हिमेश रेशामिया आणि नुकतेच बॉबी देओल त्याची जिवंत उदाहरणे आहेत. आता भाईंनी कपिल शर्माची जबाबदारी घेतली. एकेकाळी कॉमेडी किंग म्हणून घरा-घरात आपली विशेष जागा बनवणारा कपिल शर्मा सध्या स्ट्रगल करत आहे. त्याचा शो कुणीही स्पॉन्सर घेण्यास तयार नाही. अशात सलमान खानने त्याला मदतीचा हात दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, भाई 'द कपिल शर्मा शो' शो प्रोड्यूस करण्याच्या तयारी आहे.


  कपिलचे दोन सीझन यापूर्वी दोन वेग-वेगळ्या प्रॉडक्शन हाऊसने स्पॉन्सर केले होते. यात K9 प्रॉडक्शन आणि फ्रेम्स प्रॉडक्शन यांचा समावेश होता. कपिलच्या अनप्रोफेशनल वर्तनामुळे फ्रेम्स प्रोडक्शनने पहिले सीझन करण्यास नकार दिला. प्रोड्युसर आणि कपिलचे संबंध बिघडले. कपिलने एकटेच प्रोड्युस करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पैसे नसल्याने तो असे करू शकला नाही. दुसऱ्या सीझनची गत अशीच झाली. दोन्ही सीझन बंद पडल्यानंतर कपिलने स्पॉन्सर्स शोधण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, कुणीही तयारी दाखवली नाही. अखेर सलमान खानने त्याला मदतीचा हात दिला. तसेच सलमान खान प्रॉडक्शन हाउसतर्फे शो सादर करण्यात मदत करणार अशी चर्चा आहे.

  कीकू शारदा, भारती सिंह आणि सुमोना करणार काम
  -
  अपकमिंग सीझनमध्ये कलाकारांची टीम तीच राहावी असा चॅनलचा आग्रह आहे. अशात संपूर्ण टीमला तयार करणे कठिण जात आहे. चॅनलने उपासना सिंह, चंदन प्रभाकर, अली असगर, सुगंधा मिश्रा आणि रोशेल राव यांना अप्रोच केले होते. त्या सर्वांनी होकार दिलेला नाही. तर दुसरीकडे, कीकू शारदा, भारती सिंह आणि सुमोना चक्रवर्ती शोमध्ये काम करण्यास तयार झाले आहेत.
  - सर्व काही सुरळीत राहिल्यास हा शो जानेवारीपासून सुरू होणार आहे. सुरुवातीला हा शो याच वर्षी लॉन्च करण्याचा प्रयत्न होता. परंतु, संपूर्ण तयारी झाल्याशिवाय शो सुरू करणार नाही असे ठरवण्यात आले आहे. शोचा फॉरमॅटपासून कलाकारांच्या फायनल यादीपर्यंत खूप कामे अजुनही पेन्डिंग आहेत.

  सुनील ग्रोव्हरला परत आणण्याचा प्रयत्न

  कपिल शर्मा आपला जुना मित्र सुनील ग्रोव्हरला सुद्धा शोमध्ये समाविष्ट करू इच्छित आहे. परंतु, सुनीलने त्यास अजुनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. तूर्तास सुनील ग्रोव्हर एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. भास्करला दिलेल्य मुलाखतीमध्ये सुनीलने आपण चित्रपटांचे शूटिंग करत असून सध्या कुठलाही शो करण्यासाठी पुरेसा वेळ नाही असे म्हटले होते. तरीही सुनीलला कुठल्याही परिस्थितीत शोमध्ये परत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कपिलSalman Khan Support Kapil Sharma Produce Upcoming Show The Kapil Sharma Show
 • ने अपेक्षा सोडलेल्या नाहीत.

Post a Comment

 
Top