0
  • Grandmother killed her two months grand daughterजयपूर- मुरलीपुरा परिसरातील देवनगर चाळीत 50 वर्षीय विमला देवीने गुरुवारी दुपारी आपल्या एकुलत्या एक 2 महिन्यांच्या नातीची निर्घृण हत्या केली. कारण एकच तिला नातू हवा होता. आधी उशीने तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला, पण अयशस्वी झाली तेव्हा पाण्याच्या हौदात बुडवून मारले. हैराण करणारी बाब म्हणजे विमला 3 मुलींची आई असूनसुद्धा तिने हे पाशवी कृत्य केले. ही घटना 24 तास लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु दवाखान्यातून रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी सर्व अँगलने तपास करायला सुरूवात केली. जेव्हा पोलीसांना आजीवर संशय आल्याने पोलिसांनी आजीची चौकशी केली तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.

    नातीच्या हत्येनंतर निवांत झोपली आजी
    डीसीपी अशोक कुमार गुप्ता म्हणाले, मृत चिमुरडीचे वडील अनिल साबू यांचे दुकान आहे. गुरुवारी सकाळी ते दुकानावर गेलेले होते. घरात 2 महिन्यांची दृष्टी, तिची आई आणि आजी हेच होते. पोलिस चौकशीत आजी विमला म्हणाली की, तिने सुनेला वरच्या खोलीची साफसफाई करायला पाठवले होते. यानंतरच तिने दृष्टीला मारण्याचा कट रचला अन् अमानूष हत्या केली.
    गोंधळ उडताच नातीला शोधण्याचे केले नाटक
    सून साफसफाई करून खाली येताच तिने सासूकडे मुलीची चौकशी केली. यावर विमलाही सुनेसोबत दृष्टीला शोधण्याचे नाटक करू लागली. तान्हुली सापडेना म्हणून आरडाओरड करत शेजाऱ्यांनाही बोलावले. परंतु अथक प्रयत्न करूनही मुलगी सापडलीच नाही. यानंतर मात्र आजी विमलाने स्वत:हूनच पाण्याच्या हौदाकडे इशारा केला व त्याठिकाणी शोधण्याचे नाटक केले. तेथे पाहताच दृष्टी पाण्यात बुडालेली आढळली. यावर ताबडतोब तिला दवाखान्यात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
    अशी सापडली मारेकरी आजी
    पोलिस तपासात समोर आले की, हौदावर जड झाकण आहे. अवघी 2 महिन्यांची चिमुरडी तिथपर्यंत जाईलच कशी? यावरून पोलिसांचा ही हत्या असल्याचा संशय बळावला. अधिक चौकशीत समोर आले की, मुलीचा शोध घेताना आजीनेच हौदाकडे इशारा केला होता. शेजाऱ्यांच्या चौकशीतही कळले की, सासू-सुनेत सारखी भांडणे व्हायची. यावरून पोलिसांचा आजीवर संशय वाढ    

Post a Comment

 
Top