- नवी दिल्ली- ‘मी टू’ माेहिमेमुळे अाराेपांच्या गर्तेत अडकलेले केंद्रीय राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर अाणखी एका महिला पत्रकाराने लैंगिक शाेषणाचा अाराेप केला आहे. गेल्या ३ दिवसांत असा आरोप करणारी ही नववी महिला पत्रकार आहे. बुधवारी एका इंग्रजी वर्तमानपत्रातील स्थानिक संपादक सुपर्णा शर्मा यांनी अाराेप केला की, १९९० मध्ये वृत्तपत्राच्या सुरुवातीच्या काळात अकबर यांनी त्यांच्यासाेबत अाक्षेपार्ह वर्तन केले. त्या वेळी सुपर्णा या अकबर यांच्या टीमची सदस्य हाेत्या. यापूर्वी प्रिया रमाणी, शुमा राहा, गजाला वहाबसह इतर महिलांनी एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक शाेषणाचे अाराेप केले अाहेत. त्यामुळे अकबर यांच्यावर टीकेची झाेड उठली अाहे. मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पत्रकारांनी याबाबत विचारले मात्र, त्यांनी बाेलण्यास नकार दिला. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी मात्र बुधवारी यावर भाष्य करत अशी प्रकरणे गांभीर्याने घ्यायला हवीत, असे परखड मत व्यक्त केले. दरम्यान, काँग्रेसचे नेते जयपाल रेड्डी यांनी अकबर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली अाहे.
...तिकडे एम.जे. अकबर यांचे नायजेरियात भाषण
गरिबी हटवायची असेल तर महिलांचे सबलीकरण करायला हवे. महिलांसाठी केलेली गुंतवणूक ही निश्चितच भविष्यासाठीची गुंतवणूक होऊ शकते.’
अाराेपांबाबत सरकारचेही माैन, शुक्रवारी परततील एमजे अकबर
व्यावसायिक कार्यक्रमासाठी अकबर नायजेरियात गेले अाहेत. ७० भारतीयांच्या शिष्टमंडळाचे ते नेतृत्व करत अाहेत. शुक्रवारी ते भारतात परततील. त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शाेषणाच्या अाराेपांना त्यांनी व सरकारने उत्तर दिलेले नाही.
मनेका गांधी म्हणाल्या, ‘अनेक उच्चपदस्थ असेच वागतात; चौकशी व्हावी’
मंत्री मनेका म्हणाल्या, ‘उच्चपदस्थांपैकी अनेक पुरुष नेहमीच असे वागतात. माध्यमे, राजकारण, कंपन्यांत हे प्रकार चालतात. बदनामीच्या भीतीने महिला बोलत नाहीत. पण आता त्या बोलत असतील तर त्यांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे.’
गायक कैलाश खेर याच्यावरही गायिका साेना माेहपात्रा यांच्याकडून अाराेप
सुफी गायक कैलाश खेर यांच्याविराेधात गायिका सोना मोहपात्रा यांनीही शाेषणाचे अाराेप केले. संगीतकार राम संपतची पत्नी असलेल्या साेनाने सांगितले की, एका कार्यक्रमात भेटले असता खेर यांनी छेडछाड केली. यापूर्वीही काही महिलांनी त्यांच्यावर अाराेप केलेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment