0
अॅक्ट्रेस तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर लैंगिक शोषणाचा आरोप लावल्यानंतर इतरही अभिनेत्री आणि सेलिब्रिटीज समोर येऊन बोलू लागल्या आहेत. अनेक सेलिब्रिटी अॅक्टर्सवर शोषणाचे आरोप होत आहेत. यात आता आणखी एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे संस्कारी आलोक नाथ यांचे. आलोक नाथ यांच्यावर लेखिका आणि फिल्ममेकर विंटा नंदा यांनी बलात्काराचे आरोप केले आहेत. एका मोठ्ठ्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी ही आपबिती सांगितले. 1994 मध्ये प्रिसिद्ध शो 'तारा' दरम्यान त्यांच्यावर रेप झाल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी थेट आलोक नाथ यांचे नाल घेतलेले नाही, पण त्यांनी तो अभिनेता संस्कारी होता असे सूचक वक्तव्य केले आहे.


काय म्हणाल्या विंटा...(फेसबूक पोस्ट जशीच्या तशी अनुवादीत केली आहे)
त्यांची बायको माझी चांगली मैत्रीण होती. आमचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. आमचे फ्रेंडसर्कल एकच होते. आम्ही सर्व एकाच थिएटर ग्रुपचे होतो. त्या काळात मी एका चॅनलचा नंबर एकचा शो 'तारा' प्रोड्युस करत होते. मीच ती लिहित होते. ते माझ्या शोच्या लीड हिरोईनच्या मागे लागले होते. पण तिला त्यांच्यात रस नव्हता. ते दारुडे होते, नालायक होते आणि अत्यंत घाणेरडेही.. पण त्या दशकात ते टीव्हीचे मोठे नावही होते. त्यामुळे वाईट वर्तनासाठी त्यांना माफही केले जायचे उलट काही लोक त्यांना असे करायला चिथावणी द्यायचे.

ते या लीड अॅक्ट्रेसबरोबर गैरवर्तन करत राहिले. अनेकदा ते असे करायचे आणि सर्व फक्त पाहत राहायचे. तिने आम्हाला तक्रार केली तेव्हा आम्ही ठरवले की, त्यांना शोमधून काढायचे. आम्हाला शेवटचा एक शॉट हवा होता. तो झाल्यावर आम्ही त्यांना सोबत काम करायचे नाही हे सांगणार होतो. पण त्यांना याबाबत समजले. ते प्रचंड दारु पिऊन सेटवर आले. कॅमेरा रोल होताच त्यांनी अॅक्ट्रेसबरोबर गैरवर्तन सुरू केले, हा प्रकार एवढा वाढला की अॅक्ट्रेसने त्यांचा थोबाडीत मारली. आम्ही त्यांना सेटवरून जाण्यास सांगितले आणि शोमध्ये ते असणार नाहीत हेही स्पष्ट केले.

त्यानंतर शो सुरू होता. रेटींगही चांगले येत होते. पण चॅनलने लीड अॅक्ट्रेस बदलण्यास सांगितले. आम्ही ते शक्य नसल्याचे सांगितल्याने चॅनलने मालिकेत लीप आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मालिकेत ताराच्या रुपात नवीन तरुण अॅक्ट्रेसला आणण्यात आले. आम्ही तयार झालो. सगळी तयारी झाली होती. नव्या एपिसोडच्या शूटच्या एक दिवस आधी आम्हाला समजले की, ज्या हिरोला आम्ही काढून टाकले होते तोच पुन्हा लीड अॅक्टर म्हणून परत मालिकेत येणार आहे. आमचा नाइलाज झालेला होता. त्याच चॅनलवर आमचे आणकी 4 सो सुरू होते, त्यामुळे आम्ही यासाठी तयार झालो.

लीपनंतरचा नवा शो सुरू झाला. आठवडाभर चालला. आम्हाला नव्या सीईओंनी बोलावले आणि या शोसह आमचे सर्व शो बंद करण्यास सांगितले. सीईओने माझा अपमान करत आम्हाला हाकलून लावले. माझ्यासारख्या बाईला देशातून काढून टाकावे असे म्हटले.

यापुढे माझ्याबरोबर सर्वात वाईट घडले. मी स्वतंत्र महिला आहे. मी स्मोक करते, दारु पिते जीवनावर प्रेम करते. त्याच अॅक्टरच्या घरी एका पार्टीसाठी मला एका मध्यस्थाच्या माध्यमातून आमंत्रित केले होते. त्याची बायको माझी मैत्रीण घरी नव्हती. ग्रुपच्या मित्रांचे फार कमी भेटणे व्हायचे, त्यामुळे पार्टीला जाण्यात काही चूक वाटले नाही. पार्टी सुरू झाली. मी काही ड्रींक्स घेतले. पण त्यात काहीतरी मिसळल्याचे जाणवले आणि मला विचित्र वाटू लागले. रात्री 2 च्या सुमारास मी तिथून निघाले. मला कोणीही घरी सोडण्याची तयारी दाखवली नाही हे काहीचे विचित्र होते. येथे फारकाळ राहणे योग्य नाही असे मला जाणवले.

रस्त्यात असतानाच तो व्यक्ती कारने माझ्या मागे आला आणि मला आत बसण्यास सांगून तो मला घरी सोडतो असे म्हणाला. मी त्याच्यावर विश्वास ठेवून कारमध्ये बसले. त्यानंतर मला फारसे काही लक्षात नाही. माझ्या तोंडात आणखी दारु ओतल्याचे मला धूसरपणे आठवते. दुसऱ्या दिवशी मी दुपारी झोपेतून उठले तेव्हा मला प्रचंड वेदना होत होत्या. माझ्यावर फक्त बलात्कारच झालेला नव्हता तर मला माझ्या घरी आणून माझा छळ करण्यात आला होता. मला बेडवरून उठताही येत नव्हते. मी काही मित्रांना सांगितले पण सर्वांनी मला विसरून जाण्यास सांगितले.

Post a Comment

 
Top