0
 • honour Killing in Solapur Father Murdered Daughter student of MBBSधरण्यात यावे असे चिठ्ठीत लिहिले आहे.मंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रूक येथे ऑनर किलिंगची घटना उघडकीस आली आहे. सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने वडील व सावत्र आईने २२ वर्षीय बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेणाऱ्या आपल्या भावी डॉक्टर मुलीला ठार मारल्याची फिर्याद तिच्या चुलत मामाने दाखल केली आहे. मुलीवर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी वडील विठ्ठल धोंडिबा बिराजदार (वय ५५) व सावत्र आई श्रीदेवी विठ्ठल बिराजदार (वय ४३) यांच्याविरुध्द पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांना शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. अनुराधा विठ्ठल बिराजदार(वय २२ वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे.

  मृत अनुराधाचे चुलत मामा बाळासाहेब म्हमाणे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेची हकीकत अशी :बिराजदार यांच्या घरी कर्नाटक येथील सालगडी कामाला होते. त्याच्या मुलाशी अनुराधाचे प्रेमसबंध जुळले. तिने त्याच्याशी विवाहही केला. विवाहानंतर देवदेव करून अनुराधा पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली. ती सिंदगी येथे बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत होती. तेथेच हा प्रेमविवाह झाला. प्रेमविवाहाचे वृत्त समजताच वडील विठ्ठल बिराजदार अनुराधाला तडकाफडकी सिंदगी येथे येऊन घेऊन आले. बोराळे येथील तिच्या मामाकडे त्यांनी तिला सोडले. माझी बदनामी झाली आहे, तिला आता जिवंत ठेवणार नाही, असा त्रागा त्याने तेथून जाताना व्यक्त केला होता. ४ ऑक्टोबरला दुपारी १:३० च्या सुमारास तो पुन्हा बोराळे येथे आले. अनुराधाची शाळेतील तोंडी परीक्षा राहिल्याचे सांगून पुन्हा तिला इनोव्हा गाडीतून घेऊन गेले. ५ ऑक्टोबरला पहाटे २:३० च्या सुमारास म्हमाणे यांच्या मावशीच्या मुलाने अनुराधा मृत झाल्याची धक्कादायक बातमी त्यांना फोनवरून दिली. तिचा अंत्यविधीही झाल्याचे सांगितले. मात्र सलगर (बु.) येथे अनुराधाला वडील आणि सावत्र आईने पहाटे शेतात नेले. खून केला व पहाटेच अंत्यविधी उरकल्याची फिर्याद अनुराधाच्या मामाने दिली. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत. दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दत्तात्रय तोंडले व पो.कॉ.संजय गुटाळ यांनी दोन्ही आरोपींना सलगर बु. येथून ताब्यात घेतले.
  पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये 
  संशयित आरोपी विट्ठलला पहिल्या पत्नीपासून दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्ये होती. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. एक मुलगी १६ वर्षापूर्वी मरण पावली. एक मुलगा मतिमंद आहे.
  अनुराधाने लिहिलेल्या दोन चिट्ठ्या सापडल्या 
  अनुराधाच्या दोन चिठ्ठ्या आजीला सापडल्या आहेत. त्यात वडील व सावत्र आईपासून माझ्या जीविताला धोका आहे. ते मानसिक त्रास देतात. मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझा मृत्यू झाल्यास त्यांना जबाबदार 

Post a comment

 
Top