0नवी दिल्ली - भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीजवळ पोहोचले आहेत. हरिव्दारहून निघालेल्या या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशाची परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही शेतकरी त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. पोलिसांनी लावलेल्या बॅरीकेट्सवर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर चढवले अशून शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा केला जात आहे. पोलिसांनी दिल्ली-युपी बॉर्डर सील केली असून मोठ्या संख्येने सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून पूर्व दिल्लीमध्ये कलम-144 लागू कPDAT- शेतकऱ्यांच्या दगडफेकीला पोलिसांकडून सौम्य लाठीमाराने प्रत्युत्तर
 • u- शेतकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक
  - जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांच्या वापर
  - पोलिसांकडून शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पाण्याचा मारा
  - शेतकऱ्यांनी बॅरीकेट्सवलर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.
  - दिल्लीच्या सीमेवर पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न, मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात, ठिकठिकाणी बॅरीकेट्स लावले.
  कर्जमाफी आणि वीज बिलाचे दर कमी करण्याच्या मागण्यांसाठी 23 सप्टेंबरला हरिद्वारमधून किसान क्रांती पदयात्रा सुरू झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर आणि मेरठ जिल्यांच्या मार्गे काल ही पदयात्रा गाझियाबादपर्यंत पोहोचली होती. त्याठिकाणी या शेतकऱ्यांना अडवण्यात आले होते. गांधी जयंतीच्या निमित्ताने राजघाट ते संसद असा मार्च काढण्याची या शेतकऱ्यांची इच्छा होती. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांनी बॅरीकेटींग केले असून दिल्लीकडे जाणारे सर्व मार्ग सील केले आहेत.
  आदित्यनाथ यांच्याशी चर्चा अपयशी 
  हरिद्वारहून दिल्लीला जाण्यासाठी किसान क्रांती पदयात्रा सोमवारी उत्तरप्रदेशच्या साहिबाबाद येथे पोहोचली होती. त्यांनी दिल्लीकडे कूच केले. जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण शेतकरी त्यांच्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हिंडन एअरपोर्टवर भेट घेतली. त्यांच्यात दोन तास चर्चा झाली, पण ही चर्चा अपयशी ठरली.

Post a comment

 
Top