- चेन्नई - दक्षिण भारतातून लाइव्ह मर्डरचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तमिळनाडूच्या कोएंबतूर शहरातील कोवईपुदूर परिसरात शुक्रवारी ही घटना घडली आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव जमील अहमद असे होते. जमील अहमद (75) शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी आपल्या घराजवळच एका मशीदीत जात होते. त्यावेळी रस्त्यावर दुसरे कुणीही नव्हते. तेवढ्यात अचानक एक हल्लेखोर येऊन धडकला. त्याने जमील यांच्यावर चाकूने सपा-सप वार केले. या हल्ल्यात जमील जागेवरच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली आहे.
नातेवाइकानेच केला खून
पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता आरोपी त्या वयोवृद्ध व्यक्तीचा अतिशय जवळचा नातेवाइक रिझवान निघाला. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संपत्तीवरून वाद सुरू होता. पोलिसांनी आरोपी अटक केली आहे. त्याने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जमील अहमद दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या घराजवळ असलेल्या एका मशीदीत नमाजसाठी जात होते. त्यावेळी आरोपी रिझवान रस्त्याच्या कडेला एका झाडामागे चाकू घेऊन थांबला होता. जमील अहमद दिसताच त्याने त्यांच्या पाठीवर सपा-सप वार केले. जमील यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नही केला. परंतु, रिझवानने इतके वार केले की त्यांना वाचण्याची संधीच दिली नाही. रक्तबंबाळ झालेले जमील रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता आरोपी त्या वयोवृद्ध व्यक्तीचा अतिशय जवळचा नातेवाइक रिझवान निघाला. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संपत्तीवरून वाद सुरू होता. पोलिसांनी आरोपी अटक केली आहे. त्याने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जमील अहमद दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या घराजवळ असलेल्या एका मशीदीत नमाजसाठी जात होते. त्यावेळी आरोपी रिझवान रस्त्याच्या कडेला एका झाडामागे चाकू घेऊन थांबला होता. जमील अहमद दिसताच त्याने त्यांच्या पाठीवर सपा-सप वार केले. जमील यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नही केला. परंतु, रिझवानने इतके वार केले की त्यांना वाचण्याची संधीच दिली नाही. रक्तबंबाळ झालेले जमील रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment