0
  • india vs west indies test series first test 2nd day live news and updatesराजकोट - वेस्ट इंडिज विरोधातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने 24 वे कसोटी शतक पूर्ण केले. या कामगिरीने त्याने इंग्लंडचे ग्रॅग चॅपल आणि वेस्ट इंडिजच्या व्हीव्हीयन रिचर्ड्स यांची 24 शतकांची बरोबरी केली. विराट कोहली बरोबरच रिषभ पंतही शतकाच्या दिशेने कूच करत आहे. त्याने अर्धशतकानंतर फटकेबाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.


    विराटच्या भारतात 3,000 कसोटी धावा 
    विराट कोहलीने भारतात खेळताना कसोटीतील 3,000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने भारतात 33 कसोटी खेळल्या आहेत. त्यात त्याने 10 शतके झळकावली आहेत. त्यात पाच द्विशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी देशातील सामन्यांत 65 पेक्षा जास्त आहे.

    सलग तिसऱ्या वर्षी 1000 धावा करण्याची संधी 
    विराटला सलग तिसऱ्या वर्षी टेस्टमध्ये एका कॅलेंडर इअरमध्ये 1000 धावा करण्याची संधी आहे. विराटने यावर्षी 9 कसोटींत 59.43 च्या सरासरीने 951 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

Post a comment

 
Top