0
  • स्पेशल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात बेरोजगार युवकांना कांदे-भजे विकण्याचा सल्ला दिला होता. काँग्रेससह विरोधकांनी देशभर या वक्तव्याला वादग्रस्त विधान असा प्रचार केली. अनेक ठिकाणी टीका सुद्धा झाली. परंतु, मोदींच्या या सल्ल्याने एका व्यक्तीचे अख्खे आयुष्य बदलले आहे. वडोदरा येथे राहणारा नारायण याने पीएम मोदींचा सल्ला ऐकूण भजे विक्रीचा स्टॉल सुरू केला. हळू-हळू त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की आता दररोज 30 हजार रुपयांची कमाई करत आहे. एवढेच नव्हे, तर अतिशय कमी वेळात त्याने आपल्या शहरभर 35 हून अधिक शाखा सुद्धा काढल्या आहेत.


    मोदींच्या भाषणातून मिळाली प्रेरणा
    काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI चा सदस्य नारायण याने आपल्या यशाचे श्रेय पीएम नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला दिले आहे. याच भाषणात मोदींनी युवकांना भजे विकून सुद्धा कमाई करण्याचा मंत्र दिला होता. त्यातूनच प्रेरित होऊन नाराणयने एक भज्यांचे स्टॉल लावले. सुरुवातीला त्याने 10 किलोग्राम मालातून भजे बनवले. अवघ्या 4 महिन्यातच त्याच्या स्टॉल आणि भज्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली की त्याला 500 ते 600 किलोग्राम माल तयार करावा लागत आहे. मोदींनी फेब्रुवारी महिन्यात एका टीव्ही चॅनलशी बातचीत करताना हा सल्ला दिला होता.

    शहरभर 35 शाखा
    नारायणने आपल्या स्टॉलचे नाव "श्रीराम दालवडा" असे ठेवले होते. त्याने सुरुवातीला वडोदरा येथील कालाघोडा परिसरात एक स्टॉल लावले. एका स्टॉलने सुरुवात करणाऱ्या नारायणच्या आता शहरभर 35 हून अधिक शाखा आहेत. "श्रीराम दालवडा" आता एक ब्रँड आणि फ्रेंचायझी म्हणून समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नारायण आता आयटी रिटर्न सुद्धा फाइल करत आहे
    .

Post a Comment

 
Top