0
 • yuvika chaudhary dance with mother And Father in law, bigg boss Ex contestant also attendमुंबई. 'बिग बॉस-9' चा विजेता आणि अॅक्टर प्रिंस नरुला आणि शोची Ex-कंटेस्टेंट राहिलेली युविका चौधरी यांचे गुरुवारी संगीत ठेवण्यात आले. मुंबईमध्ये या कपलची संगीत सेरेमनी झाली. यावेळी 'रोडीज' फेम रणविजय सिंह, 'बिग बॉस' एक्स कंटेस्टेंट प्रियांक शर्मा, रश्मि देसाई, मोनिका बेदी, गर्लफ्रेंड अनुषा डांडेकरसोबतच करण कुंद्रा आणि अनेक सेलेब्स पोहोचले. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात युविका-प्रिंसचे ज्या लोकांसोबत नेहमी भांडण व्हायचे, तेसुध्दा या संगीत सेरेमनीमध्ये पोहोचले. या लोकांनीही कपलसोबत चांगला डान्स केला. संगीतचे इनसाइड व्हिडिओज समोर आले आहे. यामध्ये प्रिंस-युविकाला कडेव उचलून तर कधी तिच्यासोबत ढोल वाजवून वेगवेगळे डान्स करताना दिसतोय. युविकाने संगीतमध्ये व्हाइट कलरचा लहेंगा घातला होता. यानंतर त्यांनी डान्स फ्लोरसाठी चेंज करुन पीच कलरचा लहेंगा घातला आणि तुफान डान्स केला.
  सास-याने होणा-या सुनेवर केला नोटांचा वर्षाव 
  - संगीत सेरेमनीमध्ये युविकाने आपल्या सासु आणि सास-यांसोबत डान्स केला. युविकाने स्वतः त्यांना डान्स फ्लोरवर घेऊन आली. तर प्रिंस या दरम्यान टाळ्या वाजवताना दिसला. 
  - एवढेच नाही, युविका जेव्हा प्रिंस आणि आपल्या सासूसोबत फ्लोरवर डान्स करत होती, तेव्हा सास-याने त्यांच्यावर 2000-2000 रु. च्या नोटांचा वर्षावर केला. संपुर्ण संगीत सेरेमनीमध्ये युविकाने प्रिंस आणि सेलेब्स, नातेवाईकांसोबत डान्स केला. 
  - प्रिंस-युविकाचे लग्न मुंबईमध्ये 12 अक्टोबरला होणार आहे. तर 21 अक्टोबरला प्रिंसचे होमटाउन चंदीगढमध्ये रिसेप्शन होईल.
  प्रिंसच्या लग्नात जाणार नाही बेस्ट फ्रेंड सुयश 
  - प्रिंसच्या लग्नात त्याचा सर्वात क्लोज फ्रेंड आणि टीव्ही अॅक्टर सुयश राय सहभागी होणार नाही. लग्नात सहभागी होऊ न शकल्यामुळे सुयश खुप दुःखी आहे. 
  - तो सतत प्रिंसला व्हिडिओ कॉल करुन फंक्शन्स पाहत आहे. हळदी-मेंदी आणि संगीत मीस केल्यामुळे सुयशने सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेअर करत लिहिले की, "मला माफ कर, मी तिथे उपस्थित नाही, यामुळे मला खुप वाईट वाटतेय."
  - "मी दिर्घकाळापासून या क्षणाची वाट पाहत होतो आणि हे होत आहे तर मी तिथे नाही. तुला सर्व आनंद मिळो, हिच इच्छा आहे. पुन्हा एकदा सॉरी, मला माफ कर"
  - सुयश येथे पोहोचू शकला नाही, पण त्याची पत्नी किश्वर मर्चेंट येथे पोहोचली. ती प्रिंसची मानलेली बहीण आहे

Post a Comment

 
Top