0
 • ICICI BANK CEO chanda kochhar resign from post with immediate effectनवी दिल्ली- चंदा कोचर यांनी गुरुवारी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी-सीईओ) पदाचा राजीनामा दिला. बँकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. चंदा यांनी बँक आणि बँकेच्या इतर विभागांच्या संचालक मंडळातूनही राजीनामा दिला आहे. चंदा यांच्याविरोधात सुरू असलेला तपास सुरूच राहणार असल्याचे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या तपासाच्या निकालानंतर निवृत्तीनंतर त्यांना मिळणारे सर्व लाभ अवलंबून असणार आहे.


  ५७ वर्षीय चंदा यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ मार्च २०१९ रोजी संपणार होता. त्यांनी अचानक राजीनामा देण्यामागचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. या दरम्यान बँकेचे स्वतंत्र संचालक एम.डी. माल्या यांनीही आरोग्याचा हवाला देत संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. चंदा यांचे पती दीपक कोचर यांची कंपनी न्यूपाॅवर रिन्युएबल्समध्ये व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांनी गुंतवणूक केली होती. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले. बँकेने मेमध्ये न्या. बी.एन. श्रीकृष्ण समितीला तपासाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर चंदा कोचर यांनी सुटी घेतली होती. सीबीआयदेखील या प्रकरणाचा तपास करत आहे.

  जुन्या गाण्यांची आवड 
  १९६० मध्ये जन्म झालेल्या संदीप बक्षी यांनी चंदिगडच्या पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि एक्सएलआरआय जमशेदपूरमधून व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. सर्वात आधी त्यांनी १९८३ मध्ये कॉम्प्युटर मार्केटिंग कंपनी ओआरजी सिस्टिमसाठी काम केले होते. संदीप यांना जुनी हिंदी गाणीही आवडतात.

  शेअरमध्ये ४.०७ टक्के तेजी 
  चंदा कोचर यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये गुरुवारी ४.०७ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात अाली. शेअर १२.३५ रुपयांनी वाढून ३१५.९५ रुपयांवर बंद झाले.

  ९ वर्षांपासून एमडी-सीईओ 
  - १९८४ : मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्यांनी बँकेत कामाला सुरुवात केली. 
  २००९ : चंदा कोचर यांना बँकेच्या एमडी-सीईओ पदी नियुक्ती मिळाली. 
  २०११ : चंदा कोचर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
  २०१७ : फोर्ब्जने जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश केला.

  बक्षी ५ वर्षांसाठी एमडी-सीईओ 
  आयसीआयसीआय बँकेने संदीप बक्षी यांना एमडी आणि सीईओ केले आहे. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा म्हणजेच ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत असेल. त्यांना १९ जून रोजी सीईओ बनवण्यात आले. या आधी ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफचे एमडी-सीईओ होते. बक्षी यांनी १९८६ मध्ये बँकेत कामाला सुरुवात केली होती. 

Post a comment

 
Top