बीड- आम्ही सत्तेत होतो तेव्हा बोफोर्स तोफप्रकरणी आरोप करत त्यांनी चौकशीची मागणी केल्याने राजीव गांधी यांनी पुरावे देवूनही त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले होते. त्यात काहीच तथ्य निघाले नाही. आता आम्ही रफालची चौकशी केली तर माहिती गुप्त असल्याचे ते सांगत आहेत, हे कसले देशप्रेम, असा सवाल माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी बीड येथे केला आहे. या प्रकरणात काही लोकांनी माझ्यावर टीका केली. मी मोदींचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही, अशी स्पष्टोक्तीही पवारांनी यावेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी संकल्प सभेस सोमवारी राज्यात पहिल्यांदा बीड येथून प्रारंभ झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर प्रमुख उपस्थीतीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजीमंत्री प्रकाश सोळुंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, आमदार सतीष चव्हाण, आमदार रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित, माजी आमदार राजेंद्र जगताप, उषाताई दराडे, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक नेते संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, अक्षय मुंदडा, अजय मुंडे, जयसिंग सोळुंके, ज्येष्ठ नेते रवींद्र क्षीरसागर, डी.बी.बागल, बाळासाहेब आजबे, महेंद्र गर्जे, अप्पा राख, सतिष शिंदे, बापूसाहेब डोके, अशोक डक, राजेश्वर चव्हाण, नंदकिशोर मुंदडा, सुभाष राऊत, हेमंत क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, चंपावतीताई पानसंबळ, रेखा फड, सरोजिनी हालगे, बाजीराव धर्माधिकारी, लक्ष्मण पौळ, बबन गवते आदी उपस्थीत होते.
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की रफाल विमान खरेदीचा त्यावेळी सरकारने निर्णय घेतला होता. आताच्या सरकारने किंमत ठरवली पंतप्रधान मनमोहन सिंग असतांना ही किंमत 650 कोटी रूपये होती. मोदींनी ती किंमत 1600 कोटी खरेदी केली. काही लोकांनी माझ्यावर टीका केली. मोदींचे समर्थन की केलेले नाही आणि करणारही नाही, माझे म्हणणे हे होती, केंद्र सरकारचे 650 कोटीचे 1600 कोटी का झाले, याचे स्पष्टीकरण देण्याची गरज असून याची सर्वस्तरीय चौकशी व्हायला हवी. माझ्या हातात पुरावा नाही तोपर्यंत मी कुणाचे नाव घेऊन आरोप करणार नाही. विमान खरेदीची कागदपत्र दिली जात नाहीत. ती लीक करून नका, परंतु किंमतीची माहिती गुप्त का ठेवता ती दिलीच पाहीजे. आम्ही सत्तेत होतो तेव्हा बोफोर्स राजीव गांधी पंतप्रधान असताना या तोफेची खरेदी करण्यात आली होती. तेव्हा यांनीच बोफोर्स प्रकरणी चौकशीची मागणी केल्याने राजीव गांधी यांनी पुरावे दिले होते. तसेच ते चौकशीलाही सामोरे गेले होते. आता आरोप करणारे रफालची चौकशी केली तर माहिती गुप्त आहे, असे म्हणतात हे कसले देशप्रेम आहे. त्यामुळे केंद्र सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.सरकारला हाबाडा देण्याची वेळ आली
आज देशात बेरोजगारी प्रचंड वाढली.प्रधानमंत्र्याचे त्याकडे लक्षच नाही दर रविवारी आकाशवाणीवर प्रधानमंत्री मनकी बात सांगतात परंतु जन की बात एैकत नाहीत हे एैकायला मोदींचे काम बहीरे झाले आहेत.देशाच्या दु:खाकडे ते ढूंकुनही पाहत नाहीत. धनगर समाजाला आरक्षण दतो म्हणणारे भाजप सरकारने देशाची फसवणुक केली.लिंगायत मुस्लीम व मराठा आरक्षणाचा प्रश्नही कायम आहे. त्यामुळे या लबाड सरकारला घालवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता हाबाडा देण्याची वेळ आली असल्याचे शरद पवार यांनी बीडच्या विजयी संकल्प सभेला संबोधित केले.माझ्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास केला गेला
1 पवार म्हणाले, रफाल खरेदीचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात झाला. मनमाेहन सिंग हे पंतप्रधान असताना रफालची किंमत ६५० काेटी हाेती. माेदींनी १६०० काेटी मोजले आहेत.
2 या प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. ६५० वरून १६०० काेटी इतकी किंमत कशी वाढली याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असे माझे म्हणणे हाेते. मी माेदींचे कधीही समर्थन केलेले नाही व पुढेही करणार नाही.
3 माझ्या हातात पुरावा नाही ताेपर्यंत मी कुणाचेही नाव घेणार नाही. सरकार विमान खरेदीची कागदपत्रे का सादर करत नाही? ही कागदपत्रे लीक करू नका, पण देशापुढे माहिती अाणणे गरजेचे आहे.
राष्ट्रवादीमध्ये होता नाराजीचा सूर
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी संकल्प सभेस सोमवारी बीड येथून प्रारंभ झाला. या वेळी पक्षाध्यक्ष शरद पवार बोलत होते. रफाल प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतही नाराजीचा सूर हाेता. हे हेरत बीड येथील सभेत पवार यांनी रफालबाबत त्यांची व पक्षाची भूमिका स्पष्ट केली.पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... बीडमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी संकल्प सभेचे फोटो..-
-
-
-
-
Post a comment