0
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या दिवसांपासून भडका सुरुच होता. मात्र दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशीही कपात झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 38 पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 13 पैशांनी कपात जाहीर केली आहे. इंधन उत्पादनावरील खर्चात घट झाल्याने ही कपात करण्यात आली आहे. 
मुंबईत शनिवारी (20 ऑक्टोबर) पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैसे प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 87.46 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 79.00 रुपये झाला आहे. दुसरीकडे, राजधानी दिल्लीत पेट्रोल 39 पैसे तर डिझेल 12 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 81.99 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 75.36 रुपये वाहनधाराकांना मोजावे लागणार आहेत. 
Petrol & diesel prices in are Rs 81.99 per litre (decrease by Rs 0.39) and Rs 75.36 per litre (decrease by Rs 0.12), respectively. Petrol & diesel prices in are Rs 87.46 per litre (decrease by Rs 0.38) and Rs 79.00 per litre (decrease by Rs 0.13), respectively.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज होती. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला 80चा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत होती. यामुळे विरोधकांकडून मोदी टीका करण्यात येत होती. त्यानंतर केंद्र सरकारने सणासुदीचे दिवस आणि निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून चार ऑक्टोबरला इंधनाच्या दरात कपात केली होती. 

Post a Comment

 
Top