0
 • Petrol price rises again by 14 Paisa in Delhi Mumbai on Sunday 07 Octमुंबई / नवी दिल्ली - पेट्रोल-डीझेलच्या दरांमध्ये रविवारी पुन्हा वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 14 पैश्यांनी महागले. दिल्लीत पेट्रोल 81.82 रुपये लिटर आणि डीझेल 29 पैश्यांनी वाढीसह 73.53 रुपये इतके झाले आहे. तर दुसरीकडे, मुंबईमध्ये पेट्रोल 87.29 रुपये आणि डीझेल 31 पैश्यांच्या वाढीसह 77.06 रुपये प्रति लिटर पोहोचले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्र आणि राज्य सरकारने मिळून 5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी केले. त्यानंतर शनिवारी मुंबईत पेट्रोल दरांत 70 पैशांची घसरण झाली होती.


  शुक्रवारी 5 रुपयांनी स्वस्त झाले होते पेट्रोल 
  केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल-डीझेलमध्ये 1.5 रुपयांची एक्साइज ड्युटी कमी केली. तेल कंपन्यांना सुद्धा एका रुपयाने आणि राज्य सरकारांना 2.5 रुपयांनी दर कपात करण्यास सांगण्यात आले होते. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी ही अपील मान्य करत पेट्रोलचे दर कमी केले. त्यामुळे, लोकांना शुक्रवारी पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त मिळाले. परंतु, दिल्लीने इंधन दरांत कपात केली नसल्याने तेथे फक्त 2.5 रुपयांचा फरक पडला. ऑगस्ट महिन्यापासूनच पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये सलग वाढ होत आहे. 4 ऑक्टोबर रोजीच मुंबई पेट्रोलचे दर 91.34 रुपये प्रति लिटर पोहोचले होते.
  मेट्रो शहरांत पेट्रोलचे दर
  शहरशनिवारचे रेट (रुपये/लिटर)रविवारचे रेट (रुपये/लिटर)वाढ
  नवी दिल्ली81.6881.8214 पैसे
  मुंबई87.1587.2914 पैसे
  मेट्रो शहरों में डीजल
  शहरशनिवारचे रेट (रुपये/लिटर)रविवारचे रेट (रुपये/लिटर)वाढ / कपात
  नवी दिल्ली73.2473.5329 पैसे वाढ
  मुंबई76.7577.0631 पैसे कपात

Post a comment

 
Top