0
  • इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पेशावरमध्ये अमली पदार्थ विरोधी दलाच्या महिला टीमने तब्बल 400 किलो प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केला. तसेच त्या संपूर्ण मुद्देमालास आग लावून त्यासमोर हॉलिवूड स्टाइल फोटोसेशन केले. त्यांचे हेच फोटो आणि सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक त्यांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. अमली पदार्थ विरोधात महिलांनी छेडलेली ही एक नवीन मोहिम म्हणून आता लोक याकडे पाहत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये महिला हातात रायफल घेऊन पोझ देत आहेत. तर त्यांच्या बॅकग्राउंडला आगडोंब दिसून येतो. पाकिस्तानसारखा देशात जेथे महिलांना नेहमीच हीन वागणूक दिली जाते तेथील हे फोटो लोकांचा दृष्टीकोन बदलतील असे सांगितले जात आहे.


    आम्हाला हवा अमली पदार्थमुक्त समाज
    -
    अॅन्टी नारकोटिक्स फोर्स के डीजी मेजर जनरल मुसर्रत नवाज मलिक यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्या गोष्टी समाजाला संपवत आहेत, त्यामध्ये ड्रग्स सर्वात वाइट आहे. अमली पदार्थ विरोधी महिला पथकाने समाज अमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे. 
    - अनेकांनी फेसबूक, ट्विटर आणि इतर साइट्सवर हे फोटो पोस्ट करून महिलांचे कौतुक केले. त्यापैकी एकाने लिहिले या महिलांचे फोटो एखाद्या हॉलिवूड चित्रपटाचे सीन वाटत आहे. महिलांनी या फोटोंच्या माध्यमातून अमली पदार्थ विरोधात ऑनलाइन मोहिम सुरू केली. या महिला अधिकाऱ्यांच्या कामाचे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून सुद्धा तोंडभर कौतुक केले जात आहे.


Post a Comment

 
Top