0
 • नवी दिल्लीः महेंद्रा पार्क पोलिस आणि स्पेशल स्टाफने कोटिंग सेंटर टीचर अंकित सागरच्या मृत्यूचे रहस्य उकलले आहे. या प्रकरणी शुक्रवारी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये बी-टेक फायनल इयरमध्ये शिकणा-या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना आरोपी आकाश कश्यप (21) कडून एख टोपी, मास्क, बॅग आणि देशी कट्टा हस्तगत केला आहे. पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अंकित आणि आरोपी आकाशची प्रेयसी यांच्यात चांगली मैत्री होती. पण दोन वर्षांपूर्वी ही मैत्री तुटली होती. पण तरीही अंकित तिच्याशी बोलण्याच्या प्रयत्नात असायचा. अंकित त्याच्या प्रेयसीला त्रास देत असल्याचा संशय आकाशला आला. आरोपी आकाश मार्च महिन्यापासून अंकितला जीवे मारण्याची योजना आखत होता. संधी मिळताच 1 ऑक्टोबर रोजी आकाशने अंकितची गोळ्या झाडून हत्या केली.

  आरोपीला पकडण्यासाठी बनवली होती स्पेशल टीम...
  डीसीपी असलम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर रोजी पोलिसांना अंकित सागर नावाच्या युवकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची माहिती मिळाली होती. आरोपीला पकडण्यासाठी आम्ही एक टीम बनवली. महेंद्रा पार्क एसएचओ धनंजय गुप्तांच्या टीमने सीसीटीव्ही फुटेज तपासले.
  सीसीटीव्ही फुटेजमुळे पकडला गेला आरोपी..
  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी मृत अंकितचे फेसबुक अकाऊंट तपासले गेले. त्यातून अंकितचे 20 मुलींच्या संपर्कात असल्याचे समोर आले. यावरुन अंकितच्या हत्येशी यापैकी एखाद्या तरुणीचा संबंध तर नसावा, असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये घटनास्थळी आकाश महिलांची नजर चुकवून जाताना दिसला. त्याच्या डोक्यावर टोपी आणि खांद्यावर बॅग होती.
  आरोपीचा नाही क्रिमिनल रेकॉर्ड...
  पोलिसांच्या चौकशीदरम्यान आकाशने कबुली देत मार्च महिन्यापासून अंकितला जीवे मारण्याची योजना आखत असल्याचे कबुल केले. पण त्यासाठी तो हिंमत एकवटू शकत नव्हता. सात महिन्यांनी 1 ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजून 15 मिनिटांनी अंकिंतच्या कोचिंग सेंटरमध्ये जाऊन आकाशने त्याच्यावर गोळी झाडली. पोलिसांना आरोपीचा मागील क्रिमिनल रेकॉर्ड मिळाला नाही.
  2000 रुपयांत होळीला खरेदी केला होता देशी कट्टा...
  आकाश मार्च महिन्यात होळीसाठी त्याच्या बागपत स्थित गावी गेला होता. तेथून त्याने दोन हजारांत देशी कट्टा खरेदी केला होता. घटनेपूर्वी आकाशने अंकितच्या कोचिंग सेंटरची रेकी केली होती.
  चुकीचा ठरला होता अंदाज... 
  अंकित सागरच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित गेल्या आठ वर्षांपासून दुस-या समाजाच्या तरुणीच्या प्रेमात होता. कुटुंबीयांचा त्या तरुणीच्या भावावर हत्येचा संशय होता. पोलिसांनी या संशयावरुन तरुणीच्या भावाचीही विचारपूस केली होती.

Post a comment

 
Top