0

 • DD News's Cameron killed, 2 policemen killedनवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये नक्षलींच्या हल्ल्यात दिल्ली दूरदर्शन वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार व इतर दाेन पोलिस शहीद झाल्याची घटना मंगळवारी घडली. अच्युतानंद साहू असे या मृ छायाचित्रकाराचे नाव असून, ते एका निवडणूक कव्हरेज करण्यासाठी गेले हाेते. नक्षलींनी साहूंना जवळून गोळी मारली. अन्य दोघे जखमी झाले आहेत.


  दंतेवाडातील निलावाया गावातील मतदान केंद्र सुरक्षेच्या कारणाने इतरत्र स्थलांतरित केला जात. परंतु २० वर्षांनंतर पहिल्यांदाच गावात मतदान केंद्र सुरू करून तेथे मतदान करण्याची तयारी सुरू होती. त्याविषयी गावकऱ्यांत उत्साह होता. डीडीन्यूजचा तीन सदस्यीय चमू मोटारसायकलने निलावायाला जात होता. त्यांच्यामागे पोलिसही होते. परंतु निलावायाजवळ येताच दडून बसलेल्या सुमारे १०० नक्षलींनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दुचाकीवर सर्वात समोर असलेले अच्युतानंद, उपनिरीक्षक रुद्रप्रताप व सहायक मंगलू यांचा जागीच मृत्यू झाला. मागून असलेल्या सुरक्षा दलाने नक्षलींना प्रत्युत्तर दिले तेव्हा त्यांनी धूम ठोकली.
  अच्युतानंद मूळचे आेडिशाच्या बलांगीर जिल्ह्याचे होते. कव्हरेजसाठी ते दिल्लीहून आले होते. तीन दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे.पोलिस आणि नक्षली यांच्यात मंगळवारी सकाळी झालेल्या धुमश्चक्रीनंतर सुरक्षा दलाने घटनास्थळाहून ८ ते १० अत्याधुनिक स्फोटक साहित्य जप्त केल्याची माहिती विशेष पोलिस महासंचालक डी.एम. अवस्थी यांनी दिली. 
  १२ व २० नोव्हेंबरला निवडणूक : छत्तीसगडमध्ये १२ व २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील समावेश होणार आहे. मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होईल.
  ५ मिनिटे खड्ड्यात दडून बसले, आजूबाजूला अनेक ग्रेनेडचा स्फोट 
  निलावायाच्या मार्गावर ४० जवान आमच्यासोबत होते. पुढे पाच मोटारसायक होत्या. पहिल्या मोटारसायकलवर उपनिरीक्षक रुद्रप्रताप यांच्यासोबत कॅमरामन साहू बसलेले होते. नवीन रस्त्याजवळ येताच झाडाच्या मागून गोळीबार सुरू झाला. नंतर चारही बाजूंनी गोळीबार झाला. नक्षलींनी आमच्याजवळील आेळखपत्र पाहिले होते. ते ४५ मिनिटे एका खड्ड्यात दडून बसले होते. त्यामुळे जवळून गोळीबार केला. ग्रेनेडही फेकले, असे बचावलेले डीडीन्यूजचे बचावलेले प्रतिनिधी धीरज यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top