- मांडर (रांची): एखादी गोष्ट मनाशी ठरवल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी लोक स्वतःमधील कमतरता विसरून ती गोष्ट साध्य करण्यासाठी मेहनत, कष्ट घेत असतात. मग शरीर साथ देत नसले तरीदेखील व्यक्ती आपल्या हिंमतीवर पंख पसरतो. आपल्या हिंमतीच्या बळावर दिव्यांग असलेल्या मांडर प्रखंड येथील कॅम्बो गावात राहणा-या एका दाम्पत्यानेही असेच काही केले आहे.
भीक मागून भरतात खासगी शाळेत शिकणा-या धाकट्या मुलीची फीस...
- पोडहा भगत आणि परदेशिया हे पती-पत्नी दिव्यांग आहेत. भगत हे एका पायाने तर पत्नी दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. पण तरीदेखील या दाम्पत्याने हार मानली नाही आणि भीक मागून आपल्या मुलाला सीआरपीएफचा जवान बनवले. हे दोघे अनेक वर्षांपासून भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेले दुःख मुलांच्या आयुष्यात येऊ नये, यासाठी ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देत आहेत.
- पती-पत्नी भीक मागून आपल्या मुलांना आजच्या काळानुसार शिक्षण देत आहेत. त्यांच्या मुलाला सध्या मध्यप्रदेशात पोस्टिंग मिळाली आहे, तर मोठ्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात झाले आहे. त्यांची धाकटी मुलगी एका खासगी शाळेत शिकत असून भीक मागून हे दाम्पत्य आपल्याम मुलीच्या शाळेची फीस भरतात.
दिव्यांग असल्याचे दुःख नाही, देवाला जे वाटतं तेच घडतं असतं.
पोडहा यांना दिव्यांग असल्याचे दुःख नाहीये. ते म्हणतात, देवाला जे वाटतं, तेच घडतं असतं. त्यांची पत्नी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे कायम उभी असते. जेव्हा कॅम्बो नदीवर पुल नव्हता, तेव्हा ते अतिशय कठीण परिस्थितीतून आपल्या पत्नीला पुलापलीकडे घेऊन जात असतं. नदी ओलांडून ते भीक मागण्यासाठी निघत होते. इतकेच नाही तर मुलाला नोकरी लागल्यानंतरही त्यांनी भीक मागणे बंद केलेले नाही. त्यांचा मुलगा त्यांची जबाबदारी घेण्यास तयार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment