0
 • Panchkula CBI court grants regular bail to Dera chief Gurmeet Ram Rahim in castration caseपंचुकला (हरियाणा) - हरियाणाच्या पंचकुला जेलमध्ये कैदेत असेलल्या गुरमित रामरहीमला कोर्टाकडून एका प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टाने रामरहीमचा जामीन मंजूर केला आहे. हा जामीन त्याला डेरा सच्चा सौदामध्ये 400 साधूंना नपुंसक बनवल्याप्रकरणी मिळाला आहे.

  बलात्काराच्या प्रकरणात राम रहीमला 20 वर्षांची कैद
  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित रामरहीमला 2 साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर गतवर्षी कोर्टाने 20 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती. रामरहीम सध्या तुरुंगातच आहे.
  400 साधूंना नपुंसक बनवल्याचा खटला
  गुरमित रामरहीम इंसाच्या जामीनप्रकरणी पंचकुला स्थित हरियाणाच्या विशेष सीबीआय कोर्टात न्यायाधीश जगदीप सिंह यांनी सुनावणी केली. गुरमीत रामरहीमच्या रुग्णालयात तब्बल 400 हून जास्त साधूंना नपुंसक केल्याचा आरोप त्याच्यावर होता. कोर्टाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर शेवटी या प्रकरणातून राम रहीमला जामीन दिला आहे.
  तरीही तुरुंगातच राहणार राम रहीम
  तथापि, हा जामीन मिळाल्यानंतरही बाबा रामरहीम तुरुंगातच राहील. सोबतच 400 साधूंना नपुंसक बनवल्या जाण्याच्या या प्रकरणात शुक्रवारीच कपिल राठींच्या विशेष सीबीआय कोर्टातही सुनावणी होत आहे.
  राम रहीमच्या ड्रायव्हरने केले होते खुलासे
  तथापि, राम रहीमचा माजी ड्रायव्हर खट्टा सिंहने खुलासा केला होता की, राम रहीमच्या आश्रमात महिलांचे फक्त लैंगिक शोषणच होत नव्हते, तर साधूंनाही नपुंसक बनवले जात होते. डेरा सच्चा सौदामध्ये साधू म्हणून राहिलेल्या हंसराज चौहानने 17 जुलै 2012 रोजी हायकोर्टात याचिका दाखल करून राम रहीमवर 400 साधूंना नपुंसक बनवल्याचा आरोप केला होता.
  ते म्हणाले होते की, डेरा प्रमुखाच्या इशाऱ्यावरून डेरा रुग्णालयात डॉक्टरांची एक टीम साधूंना नपुंसक बनवण्याचे काम करत होती. त्यांनी 166 साधूंची नावेसुद्धा सांगितली होती. हंसराज म्हणाले होते की, राम रहीमच्या आश्रमात प्रार्थनेनंतर नशेच्या गोळ्या दिल्या जायच्या. यानंतर त्यांच्यासोबत काय व्हायचे, हे कळत नव्ह

Post a comment

 
Top