नवी दिल्ली - सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांच्या घरावर हेरगिरी प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग सीबीआयमध्ये सुरू असलेल्या वादानंतर आलोक वर्मा यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या घराबाहेर हेरगिरी करणाऱ्या 4 जणांना गुरुवारी सकाळी वर्मा यांच्या सिक्युरिटी गार्ड्सने पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. त्या चौघांच्या विरोधात हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
इंटेलिजेन्स ब्युरोची (IB) ची माणसं असल्याचा दावा
अटक करण्यात आलेली चारही माणसं कथितरित्या इंटेलिजेन्स ब्युरो अर्थात आयबीची असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, त्यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सीबीआयचे संचालक वर्मा आणि अधिकारी क्रमांक दोन राकेश अस्थाना यांना बुधवारी रात्री सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. तसेच त्यांचे ड्रायव्हर सुद्धा काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी नागेश्वर राव यांना सीबीआयचे काळजीवाहू संचालक पद देण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, वर्मा आणि सीबीआयचे अधिकारी क्रमांक दोन राकेश शर्मा यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. याच प्रकरणावरून 4 माणसे वर्मा यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पाठवण्यात आली होती असा दावा केला जात आहे.-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment