- पनवेल - चेन्नई एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची गुप्त माहिती रविवारी पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांना ही माहिती मिळताच चेन्नई-जोधपूर एक्सप्रेस दुपारी साडे चार वाजता थांबवण्यात आली. रेल्वे पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी हजर झाले. त्यातच ही माहिती प्रवाशांमध्ये पसरली आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सर्वच प्रवाशांना स्टेशनवर उतरून तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या मदतीसाठी विशेष बॉम्ब शोध पथक देखील बोलावण्यात आले. या घननेमुळे रेल्वे स्थानक परिसरात गोंधळ उडाला असून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्रवाशांच्याही बॅगांची सुद्धा कसून चौकशी करण्यात आली.
पनवेल स्थानकात येणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या निनावी फोनने ही खळबळ उडाली होती. नवी मुंबई कंट्रोल रूमला दुपारी एकच्या सुमारास निनावी कॉल आला होता. या कॉलवर चेन्नई एक्सप्रेस बॉम्बने उडवण्याचा कट लष्कर ए तोयबाने आखल्याची माहिती देण्यात आली. सुरक्षेचा उपाय म्हणून पनवेल स्थानकामध्ये बॉम्बशोधक आणि नाशक पथ - काला पाचारण करण्यात आले. परंतु, हा कॉल एक अफवा निघाली. यानंतर ट्रेन मार्गस्थ करण्यात आली आहे.
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment