भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर काय होऊ शकते, याचा एक आढावा घेतला असून त्यावर बैठकीत चर्चा होईल.
- मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादीने २०१९ च्या निवडणुकीच्या तयारीसाठी बैठकांचे सत्र सुरू केले असतानाच आता भाजपही बैठक घेण्यास सुरुवात करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार आणि गुरुवारी दादरमधील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे उपस्थित राहाणार आहेत. आगामी निवडणुका आणि शिवसेनेसोबत युतीबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर काय होऊ शकते, याचा एक आढावा घेतला असून त्यावर बैठकीत चर्चा होईल. स्वबळावर किती जागा येतील, युती केल्यास किती फायदा होईल तसेच भाजपने चार वर्षांत केलेली कामे, अंतर्गत सर्वेक्षण शिवसेनेसोबत युती करण्यासाठी मन वळवण्यासाठीही प्रयत्न करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीचीही बैठक दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही बुधवारी एका बैठकीचे आयोजन केल्याचे सूत्रांनी सांगितले.
Post a Comment