0
  • Aghori Sadhu Shocking Video Goes Viral On Social Mediaमुंबई- सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सर्वांगाला भस्म लावून एक अघोरी साधू त्याच्या आईच्या मृत शरीरावर बसून पूजा करत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तमिळनाडूमधील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जाते.

    मृत महिला ही नागा साधूची आई होती. महिलेच्या अंत्यविधीला अनेक नागा साधू उपस्थित झाले होते. अघोरी पूजा केल्यानंतर 'हर हर महादेवऽऽ' असा जयघोष करून सर्व नागा साधू महिलेचे पार्थि जमिनीत पूरतात.
    मी‍डिया रिपोर्टनुसार, तमिळनाडूतील अरियमंगलम् येथील ही घटना आहे. 70 वर्षीय महिला तिच्या मुलीसोबत येथे राहात होती. महिलेचे निधन झाले. तिच्या निधनानंतर तिचे नातेवाईक तिचे पार्थिव घेऊन स्मशानभूमीत पोहोचले. तितक्यात अघोरी साधू मणिकनाथ हा आईच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशान भूमीत आला. त्याच्यासोबत अनेक अघोरी साधू होते. तो चक्क आईच्या मृत शरीरावर बसला आणि मंत्रोपचार करू लागला. नंतर त्याने आपल्या इतर सहकार्‍यांच्या मदतीने आईला जमिनीत पुरले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आ

Post a comment

 
Top