0
बीड- साेमवारी बीड शहरातील पालवण चाैकातील नरसाेबानगर भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. चारित्र्यावर संशयावरून मारहाण करणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने अापल्या दाेन चिमुकल्या मुलींसह घराच्या हाैदात उडी घेत अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पाणी कमी असल्याने महिला वाचली पण तिच्या दाेन चिमुकल्या मुलींचा यात मृत्यू झाला. तिसरी मुलगी मात्र अाजीसाेबत अात्याकडे गेल्याने वाचली.


घटनेनंतर धास्तावलेल्या महिलेने खेर्डा येथील माहेर गाठत भावाला घटना सांगितली. यानंतर भावाने शिवाजीनगर पाेलिसांना घटनेची माहिती दिली व अापल्याच मुलींचे प्राण घेणाऱ्या या मातेला पाेलिसांनी ताब्यात घेतले. सासूच्या तक्रारीनंतर या महिलेवर शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
२००८ मध्ये राधेश्याम अाणि दीपालीचा विवाह 
गेवराई तालुक्यातील खेर्डा येथील बाबूराव रडे यांची मुलगी दीपालीचा विवाह २००८ मध्ये बन्सी अामटे ( रा. खांडेपारगाव ता. बीड ह.मु. नरसाेबानगर बीड) यांचा माेठा मुलगा राधेश्याम बरोबर झाला होता. राधेश्याम हा बीड शहरात रिक्षा चालवताे. या दाेघांना तीन मुली हाेत्या. माेठी मुलगी गाैरी (वय, ६) दुसरी गायत्री (वय,३ वर्षे) तिसरी चार महिन्यांची चिमुकली हाेती.
वडिलांचा राग पाहून अाजीसाेबत गेल्याने वाचली गाैरी 
२६ अाॅक्टाेबरला राधेश्याम व दीपालीत वाद झाला हाेता. राधेश्याम हा दीपालीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला सतत मारहाण करायचा. या वादानंतर त्याने दीपालीला जीवे मारण्याची धमकी दिली हाेती. यानंतर घाबरलेल्या घरातील राधेश्यामचे अाई, वडील, भाऊ हे गाैरीला घेऊन राधेश्यामची बहीण विद्याच्या घरी गेले हाेते. यामुळे साेमवारी (दि.२९) गाैरी दीपालीसोबत नसल्याने ती वाचली.
प्रकरणाची सखाेल चाैकशी करणार 
प्राथमिक दृष्ट्या कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याचे दिसते. या प्रकरणाची सखाेल चाैकशी करण्याचे अादेश शिवाजीनगर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुरभे व उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांना दिलेत. 
वैभव कुलबर्मे, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक
मुली मेल्यानंतर माहेरी खेर्डाला गेली दीपाली
हाैदात उडी घेतल्यानंतर पाणी कमी असल्याने दीपाली वाचली. धास्तावलेल्या अवस्थेत तिने बसने माहेर खेर्डा गाव गाठले. यानंतर तिने भाऊ मुकुंद रडेला घटनाक्रम सांगितला. मुकुंदने बीड येथील शिवाजीनगर पाेलिसांना याची कल्पना दिली व सकाळी चार वाजता ताे दीपालीला घेऊन पाेलिसांसमक्ष हजर झाला. यानंतर सासू महानंदा बन्सी अामटे यांच्या तक्रारीवरून दीपाली विरोधात दाेन चिमुकल्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला.mother killed her 4 month old daughter and three year old daughter in beed
पतीच्या त्रासाला कंटाळली हाेती दीपाली
राधेश्याम दीपालीला सतत मारहाण करत. तिच्या चारित्र्यावरून तिच्यावर संशय घेत. याला दीपाली कंटाळली हाेती. पाेलिसांनी राधेश्यामवर कारवाई करावी. 
मुकुंद रडे, दीपालीचा भाऊ.

Post a Comment

 
Top