
काय आहे हे प्रकरण?
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सायना असे पेटविण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती मुळची पंजाबची रहिवासी होती.
सायना सलमानसोबत लिव्ह इनमध्ये राहात होती. नंतर दोघांनी लग्न केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. तेव्हापासून सलमान हा सानियापासून दूर राहत होता. मात्र, सलमान बुधवारी सकाळी सकाळी अचानक घरी आला आणि त्याने सानियाच्या अंगावर केरोसिन ओतून तिला पेटवून दिले. नंतर सलामानने थेट पोलिस स्टेशन गाठले आणि आपला गुन्हा कबूल केला. सानिया जवळपास 90 टक्के भाजली होती. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सलमानला पोलिसांनी अटक केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Post a Comment