0
 • There is no connection in between Mahar Regiment and battle of Karegaon Bhimaपुणे- काेरेगाव भीमा या ठिकाणी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सैनिक व ब्रिटिश सैनिकांच्या ३ तुकड्या यांची एक जानेवारी १८१८ राेजी लढाई झाली. या वेळी पेशव्यांकडून अरब फाैज, तर ब्रिटिशांकडून कमांड कॅप्टन एफ. एफ. स्टॅनटनच्या नेतृत्वात मद्रास आर्टिलरी, दुसरी बटालियन पहिली बाॅम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री व पुणे अाॅक्झिली हाॅर्सचे सैनिक लढले. या युद्धात जय-पराजय कुणाचा झालेला नसून मद्रास अार्टिलरीच्या पाडावानंतर दुसऱ्या दिवशी पेशव्यांचे सैनिक मार्गस्थ झाले. ब्रिटिश सैनिकांचे माेठे नुकसान झाल्याने ते शिरूर कॅम्पला पुन्हा निघून गेले. मात्र, अन्नपाण्याशिवाय ब्रिटिश सैनिकांनी झुंज दिल्याच्या गाैरवाचे प्रतीक म्हणून त्यांनी १८२२ मध्ये काेरेगाव भीमा येथे स्मारक उभारून त्यावर ७८३ सैनिकांची नावे काेरली.


  दुसरीकडे, महार रेजिमेंटची स्थापना ही १९४१ मध्ये झालेली असून त्याचा काेरेगाव भीमा युद्धाशी काेणत्याही प्रकारचा संबंध नाही, असा दावा नवी मुंबर्इतील खारघर येथील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत श्यामराव पाटील यांनी बुधवारी केला. काेरेगाव भीमा येथील हिंसाचाराची चाैकशी करत असलेल्या अायाेगाचे न्यायमूर्ती (माजी) जे. एन. पटेल व सचिव सुमीत मल्लिक यांच्यासमाेर त्यांनी ही माहिती पुराव्यानिशी दिली.

  चंद्रकांत पाटील हे १८ वर्षांपासून पत्रकारितेत असून दुसऱ्या महायुद्धातील 'मराठा लाइट इन्फंट्रीची भूमिका' या विषयावर सध्या संशाेधन करत अाहेत. १ जानेवारीच्या घटनेनंतर काेरेगाव भीमा येथील इतिहासाचा चुकीचा संदर्भ दाखवला जात अाहे. त्यामुळे पाटील यांनी याबाबत मूळ इतिहासाचे संशाेधन करण्याचे ठरवले. त्यांनी ४ जानेवारी राेजी प्रत्यक्ष काेरेगाव स्तंभास भेट दिली. तसेच पुणे व मुंबर्इ येथील काेषागारातून मिळालेली ४२ कागदपत्रे व प्रतिज्ञापत्र अायाेगासमाेर सादर केले.

  पाटील म्हणाले, काेरेगाव भीमा येथील स्तंभावर चार पाट्या असून त्यातील दाेन इंग्रजीत, तर दाेन मराठी भाषेत अाहेत. येथील इतिहास हा स्तंभापुरता मर्यादित नसून सन १७९५ पासूनचा अाहे. काेरेगाव भीमाच्या लढार्इत सहभागी असलेला मद्रास आर्टिलरीचा सर्जन अाणि स्तंभ उभारणीची जबाबदारी असलेला जाॅन वायली यांचे पुस्तक अाणि ब्रिटिश पत्रव्यवहार या संदर्भावरून तत्कालीन घडामाेडींची मांडणी पाटील यांनी अायाेगासमाेर केली.

  त्रिंबक डेंगळेची भूमिका महत्त्वपूर्ण 
  पाटील सांगतात, दुसरा बाजीराव पेशवा यांचा त्रिंबक डेंगळे हा विश्वासू हाेता. महसूल रकमेवरून वाद झाल्यानंतर बडाेद्याचे सरदार गायकवाड यांचे मंत्री गंगाधर शास्त्री हे पेशव्यांसाेबत बाेलणीस अाले हाेते. त्या वेळी जुलै १८१५ मध्ये शास्त्री हे पंढरपुरातील मंदिरातून बाहेर पडताना डेंगळेंच्या सहकाऱ्यांनी त्यांचा खून केला. त्यानंतर ब्रिटीश ठाणे कारागृहात डेंगळे यास डांबतात. मात्र, ताे तेथून पळून जाताे व ब्रिटिशांविराेधात लढा सुरू ठेवताे. डेंगळे रामाेशी, भिल्ल, मांग, मराठा यांची फाैज तयार करताे, तर त्याचे पुतणे गाेदाजी व महिपत हे खान्देशात भिल्ल, रामाेशांना जमवून सैन्य तयार करतात. याच सैनिकांचा वापर पुढे पेशव्यांसाठी काेरेगाव भीमा येथील लढाईत करण्यात अाला.

  स्तंभाची कल्पना एलफिन्स्टनची 
  पेशवे शरण अाल्यानंतर २६ जुलै १८१८ राेजी ब्रिटिश अधिकारी एलफिन्स्टन याने गव्हर्नर जनरलचे सेक्रेटरी जनरल अॅडम यांना पत्रव्यवहार करून काेरेगाव येथील ब्रिटिश सैन्याने दिलेल्या चिवट लढाईची माहिती दिली. या सैनिकांच्या पराक्रमाचा गाैरव व्हावा म्हणून काेरेगाव येथे स्तंभ उभारला जावा, अशी सूचना त्याने केली. त्यावर १९ सप्टेंबर १८१८ राेजी जनरल अॅडम जाॅन यांनी वायली यांच्याकडे स्तंभाच्या उभारणीचे काम साेपवले. २६ मार्च १८२१ राेजी स्तंभाच्या पायाभरणीस सुरुवात झाली. १८२२ ला स्तंभाचे काम पूर्ण हाेऊन डिसेंबर १८२४ मध्ये स्टॅम्पटन याच्या शिफारशीवरून स्तंभाची देखभाल जमादार खंडाेजी मालाेजी माळवदकर यांना देण्यात अाली. तसेच तेथील जमीन व घर देण्यात

Post a comment

 
Top