0
nana patekar sends legal notice to tanushree dutta seeks apology
  • मुंबई - 10 वर्षांपूर्वी नाना पाटेकरने आपले लैंगिक शोषण केले, असा खळबळजनक आरोप करत अभिनेत्री तनूश्री दत्‍ताने खळबळ उडवून दिली आहे. मात्र नाना पाटेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून आपली बदनामी केल्‍याप्रकरणी तनूश्री दत्‍ताला कायदेशीर नोटिस पाठवली आहे. नानाचे वकिल राजेंद्र शिरोडकर यांनी आज (सोमवारी) याबाबत माहिती दिली.

    वकिल शिरोडकर यांनी सांगितले की, 'तनूश्री दत्‍ताला नोटिस पाठवली असून आज ती त्‍यांना मिळून जाईल. नोटिसमध्‍ये तनूश्री दत्‍ताने नानांवर लावलेल सर्व आरोप फेटाळून लावण्‍यात आले आहे. तसेच नानांची बदनामी केल्‍याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणीही करण्‍यात आली आहे.'

    मीडियाशी बोलताना शिरोडकर यांनी सांगितले की, 'तनूश्रीने नानांवर असे आरोप का केले? याबद्दल काही कल्‍पना नाही. मात्र नाना पाटेकर लवकरच मुंबईला परतणार असून पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडणार आहेत.'दुसरीकडे तनूश्री दत्‍ताने आपल्‍याला अद्याप कोणतीही कायदेशीर नोटिस मिळालेली नाही, असे सांगितले आहे.
    हा आहे तनुश्रीचा आरोप... 
    - 2008 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर गाण्याचे चित्रीकरण सुरु असताना नाना पाटेकरांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. स्क्रिप्टनुसार, हे गाणे एकट्या तनुश्रीवर चित्रीत होणार होते, पण नानांनी निर्मात्यांशी बोलून त्यात इंटीमेट सीनची मागणी केली होती, असे तनुश्रीने तिच्या आरोपात म्हटले आहे. जेव्हा तनुश्रीने इंटीमेट स्टेप करायला नकार दिला, तेव्हा नानांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना बोलावून तिच्या गाडीवर हल्ला केल्याचे तिने म्हटले आहे. 10 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा उल्लेख तनुश्रीने अलीकडेच झूम टीव्हाल दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यावेळी इंडस्ट्रीतील लोकांनी पाठिंबा दिला नव्हता, म्हणून त्रासाला कंटाळून देश सोडला होता, असेही ती म्हणाली. तनूश्री आठ वर्षे यूएसमध्ये राहून अलीकडेच भारतात परतली आहे.

Post a Comment

 
Top