0
  • Ranipada massacre: charge sheet against 28 peopleमुंबई- धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे जमावाने केलेल्या पाच भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी २८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकारी पक्षाची बाजू न्यायालयात मांडतील, अशी माहिती धुळ्याचे पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली.


    १ जुलै रोजी राईनपाडामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नाथपंथीय डवरी समाजाचे दादाराव भाेसले (३६), भारत भोसले (४५), भारत माळवे (४५), आगनू इंगोले (२०) आणि राजू भोसले (४७) हे भिक्षुकी मागण्यासाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडामध्ये आले होते. त्याच काळात राज्यभरात मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरली होती. याच संशयावरून सुमारे ३ हजारांपेक्षा जास्त संख्या असलेल्या जमावाने भिक्षुकांना बेदम मारहाण केली होती. यात पाचही जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दंगल व सहेतुक हत्येचा आरोप ठेवून आरोपपत्र दाखल केले. पोरधरी असल्याची अफवा व्हॉट्सअॅपवरून पसरल्याचेही तपासात पुढे आले आहे.

Post a comment

 
Top