औरंगाबाद - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद जिल्हा आढावा बैठकीस सुरुवात झाली आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि पालकमंत्री दीपक सावंत यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.
या बैठकीमध्ये टंचाईवर चर्चेसह 10 विविध योजनांचा आढाव घेतला जाणर आहे. यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार मुख्यमंत्री पेयजल योजना यासह विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. दुपारी 12 वाजता महानगरपालिका आढवा बैठक आणि दुपारी 1 वाजता जिल्हा कायदा व सुव्यवस्था बैठक होणार आहे. या बैठकांमध्ये मुख्यमंत्री संबंधित विभागांच्या कामाचा आढावा घेतील.
Post a Comment