0
लातूर - लातूरमधील विशालनगर वस्तीत मंगळवारी दुपारी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अपूर्वा यादव हिचा घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने खून झाला होता. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या खून प्रकरणात शेजारी राहणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. आपल्या मित्राच्या आत्महत्येला अपूर्वाच जबाबदार असल्याच्या भावनेतून त्याने तिचा खून केला, असा दावा पोलिसांनी केला आहे. अमर व्यंकट शिंदे असे अटकेतील आरोपी तरुणाचे नाव आहे.

पोलिस आणि इतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत अपूर्वा यादव, सार्थक बाळासाहेब जाधव आणि अमर व्यंकट शिंदे हे साधारण इयत्ता आठवीपासूनच एकाच शाळेत शिकत होते. अपूर्वा आणि सार्थक यांच्यातील मैत्री वय वाढताना अधिकच दृढ झाली. तिघेही मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचीही याला किनार होती. त्यातच १२ वी नंतर सार्थक जाधव औरंगाबादला तर अपूर्वा यादव कर्नाटकातील जमखंडी येथे पुढील शिक्षणासाठी गेल्यामुळे त्यांच्या मैत्रीत खंड पडला. पुढे अपूर्वा आणि सार्थक यांची मैत्रीही कमी झाली. त्यामुळे वैफल्य आलेल्या सार्थकने २७ मे २०१८ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील आपल्या गावी आत्महत्या केली. सार्थकच्या आत्महत्येला अपूर्वा यादवच कारणीभूत असल्याची फिर्याद देण्यात आल्यानंतर ढोकी पोलिस ठाण्यात तसा गुन्हाही नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात सार्थकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अपूर्वाला अटक होऊन तिला पोलिस कोठडीही मिळाली होती, अशी माहिती आहे.


अपूर्वावर ठेवली पाळत 
अमर व्यंकट शिंदे (रा. विशालनगर, लातूर) याच्या मनात अपूर्वाबद्दल राग होता. तिच्यामुळेच आपला मित्र सार्थकने आत्महत्या केल्याचा विचार त्याच्या मनात असायचा. अपूर्वा लातूरला आल्याचे कळाल्यानंतर तो तिच्या पाळतीवर होता. मंगळवारी ती घरी एकटी असल्याचे पाहून तो तिच्याघरी गेला. अपूर्वाने त्याच्यासाठी चहा केला. परंतु अमरने तिचा गळा आवळला. त्यानंतर चाकूचे तिच्या पोटात वार केले.


चाकूचा शोध 
बुधवारी पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, यांनी पत्रपरिषदेत या खुनाचे धागेदोरे सापडल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी अमर शिंदे याला अटक केल्याचे सांगितले. अमर याने खुनासाठी वापरलेला चाकू लातूर शेजारच्या एका नदीत फेकल्याचे समजते. बुधवारी पोलिस नदीपात्रात चाकूचा शोधत होते.

आपल्या मित्राची प्रेमात फसवणूक होऊन आत्महत्या करावी लागली, याचा राग अमरच्या मनात होता.

  • boyfriends friend killed her latur girl murder case solved

Post a Comment

 
Top