0

  • Raj Thackeray's visit can not be found in the dayनगर - आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जोरदार तयारी सुरू असली तरी वरिष्ठ पातळीवर अद्याप सामसूमच आहे. मनसेकडून गेल्या वेळच्या निवडणुकीत झालेल्या चुका टाळून आता नव्या चेहऱ्यांना उमेदवार म्हणून संधी देण्यात येणार आहे. याबाबत दीड महिन्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत आढावा बैठक घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात नगरमध्ये मेळावा घेण्याचा शब्दही त्यांनी दिला होता. तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हेही नगरमध्ये मेळावा घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप या मेळाव्याला मुहूर्त गवसलेला नाही.


    महापालिकेच्या गेल्या वेळच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इतर पक्षांपेक्षा वेगळेपणा जपला होता. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार मनसेच्या तिकिटावर लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात पास झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मनसेतील वरिष्ठ नेत्यांनी मुलाखती घेतल्या होत्या. या प्रक्रियेतून मनसेच्या अपेक्षेनुसार चांगले असलेले उमेदवार निवडून त्यांना मनसेचे तिकिट देण्यात आले होते. मनसेच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकारी व स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यावेळच्या मनपा निवडणुकीच्या वेळी पक्षप्रमुख राज 

    गतवेळी महापालिका निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. नंतरच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवारही नव्हता. तसेच कोणाचे काम करायचे, याचे आदेशही नव्हते. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम होता. मध्यंतरी मरगळलेल्या वातावरणामुळे काही युवा पदाधिकाऱ्यांनी मनविसेला रामराम ठोकला. दरवेळी पदाधिकारी जोरदार तयारी करतात, पण राज ठाकरे नगरमध्ये सभा का घेत नाहीत? असा प्रश्न आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला.

    इंजिन सोडून दिले 
    मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या चार नगरसेवकांना गेल्या वेळी सत्ता स्थापन करण्याच्या वेळी तटस्थ राहण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. तरीही निवडून आलेले नगरसेवकांनी ठाकरेंच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. दोन नगरसेवकांनी सत्तेत सहभागी होत राज ठाकरेंच्या आदेशाला हरताळ फासला. त्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात आले. आता या चारही नगरसेवकांनी मनसेला रामराम ठोकला आहे. याबद्दलही राज ठाकरेंनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाह

Post a Comment

 
Top