0


  • लातूर - कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मूळच्या लातूरच्या एका तरुणीचा मंगळवारी दुपारी भरदिवसा घरात घुसून खून करण्यात आला. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून यामागचे कारण सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.


    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील विशालनगर भागात अनंत यादव यांचे घर आहे. ते एक खासगी औषधी दुकान चालवतात. त्यांना एक मुलगी असून ती कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत होती. ही मुलगी सुट्यांमुळे काही दिवसांपूर्वीच लातूरमध्ये आली होती. सोमवारी दुपारी तिची आई नवरात्रोत्सवातील देवींचे दर्शन करण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्याचवेळी यादव यांच्या घरात शिरून त्यांची मुलगी अपूर्वा हिचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला. अपूर्वाची आई घरी आल्यावर त्यांना आपली मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्यांनी मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. परंतु त्या अगोदरच तिला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, विशालनगसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये भरदिवसा खुनाचा प्रकार घडल्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. एमआयडीसी पोलिसांनी खुनाच्या तपासासाठी दोन पथके कार्यान्वित केली आहेत. खुनाचे नेमके काय कारण ? या हत्ये मागे कोणाचा हात आहे याचा सायंकाळी उशिरापर्यंत तपास लागलेला नव्हता. मुलीचे आईवडील मानसिक धक्क्यात असल्याने त्यांच्याकडूनही अधिक माहिती मिळालेली नाही.
    Girl murder case in latur

Post a Comment

 
Top