0
 • Journalist chandrakant patil says about Battle of Karegaon Bhimaपुणे- काेरेगाव भीमा या ठिकाणी १ जानेवारी १८१८ रोजी पेशवे अाणि ब्रिटिशांत लढाई झाली. त्यात नेमका कुणाचा विजय अथवा पराजय झालेला नाही. याबाबतचे ब्रिटिश अधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार व अन्य पुरावे नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी काेरेगाव भीमा चाैकशी अायाेगासमाेर सादर करत साक्ष दिली.


  गुरुवारी पाटील यांची मिलिंद एकबाेटे, बाळासाहेब जमादार यांचे वकील नितीन प्रधान यांनी उलटतपासणी घेतली. अापल्या संशाेधनात कुठेही काेरेगाव भीमाची लढाई ब्राह्मण-महार अथवा इतर जातीशी निगडित हाेती याबाबतचे काेणतेही पुरावे मिळाले नसल्याचे सांगत लढाई प्रामुख्याने पेशव्यांचे अरब सैन्य व ब्रिटिश सैनिक यांच्यात लढली गेल्याचे चाैकशी अायाेगाचे न्यायाधीश (माजी) जे. एन. पटेल यांच्यासमाेरील साक्षीदरम्यान पाटील यांनी सांगितले.

  योग्य माहितीसाठी संशोधन, प्रसारमाध्यमांनी दाखवलेली माहिती आणि संशोधनातील माहितीत तफावत असल्याचा दावा

  अॅड. प्रधान : काेरेगाव भीमातील घटनेनंतर माध्यमांत दाखवण्यात अालेली माहिती व तुम्ही मिळवलेल्या माहितीत तफावत हाेती का? 
  पाटील 
  : हाेय, माध्यमांत दाखवली जाणारी माहिती खरी अाहे की खाेटी हे तपासण्यासाठी मी संशाेधन केले. खरा इतिहास लाेकांपर्यंत पाेहोचावा, हा माझा हेतू हाेता. मिळालेल्या कागदपत्रांनुसार माध्यमांतील व संशाेधनातील माहितीत फरक अाढळला.

  अॅड. प्रधान : चुकीचा इतिहास सांगून राजकीय पक्ष, व्यक्ती गैरफायदा मिळवत हाेते? घटनेनंतर समाज जातींत विभागला गेला का? 
  पाटील :
   याबाबत मला काेणती माहिती नाही, यासंदर्भात मी भाष्य करू इच्छित नाही.

  अॅड. प्रधान : काेरेगावच्या लढाईवेळी पेशव्यांची पुण्यातील खुर्ची रिकामी हाेती का, पेशवे कारभारात काेण सहभागी हाेते? 
  पाटील : 
  ५ नाेव्हेंबर १८१७ ते ३ जून १८१८ पर्यंत बाजीराव दुसरा पळून ब्रिटिशांना शरण गेला. तेव्हा पुण्यात पेशव्यांची खुर्ची रिकामी हाेती व याचदरम्यान काेरेगावची लढाई झाली. मराठा साम्राज्यात पेशवाईत १२ बलुतेदार सरदार सहभागी हाेते. मात्र, प्रशासनावर शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रशासनावर ब्राह्मणांचे वर्चस्व हाेते. ३ जून १८१८ राेजी पेशवे ब्रिटिशांना शरण गेल्यानंतर हाेळकर, शिंदे, गायकवाड, भाेसलेंची ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत संस्थाने उदयास अाली.

  अॅड. प्रधान : सातारा व काेल्हापूर गादीचे काय झाले? काेरेगावची लढाई जातीशी संबंधित हाेती का? 
  पाटील :
   २५ सप्टेंबर १८१९ च्या ब्रिटिश करारानुसार नाेव्हेंबर १८१९पासून सातारा व काेल्हापूर हे दाेन स्वतंत्र राज्ये निर्माण करून देण्यात अाली. बाळाजी नातू व ग्रँड डफ हे त्यावर ब्रिटिशांनी सल्लागार नेमले. काेरेगावच्या लढाईत पेशव्यांकडून ३ हजार अरब सैनिक, तर ब्रिटिशांकडून ८०० सैनिकांत मुख्य लढार्इ झाली. यात काेणत्याही जातीचा संबंध नव्हता तसेच ब्राह्मण-महार अशी ही लढाई नव्हती. काेरेगावातील जय स्तंभावर पेशव्यांच्या सैन्यातील अरब व निवडक लाेक, असा उल्लेख अाहे, तर ब्रिटिश अधिकारी सर एलफिन्स्टनने गव्हर्नर जनरलला लिहिलेल्या पत्रात पेशवे सैन्यात पायदळ विभागात मांग, रामाेशी, भिल्ल लाेक सहभागी असल्याचे सांगण्यात अाले अाहे.

  अॅड. प्रधान : महार समाज पेशवे अथवा ब्रिटिश यांच्याकडे ३१ डिसेंबर १८१७ पूर्वी एकमेकांविराेधात लढाईसाठी सहभागी करून घ्या, याकरिता भेटण्यास गेला हाेता का? 
  पाटील :
   नाही, याबाबत माझ्या संशाेधनात कुठेच पुराव्यात उल्लेख मिळाला नाही. जय स्तंभावर काेणत्या जात, पंथाचा उल्लेख नसून लढाईतील जखमी व मृतांची नावे मद्रास आर्टिलरीचा सर्जन जाॅन वायली याने काेरलेली अाहेत.

  अॅड. प्रधान : जय स्तंभाचा ताबा लष्कराकडे देण्यात यावा का? 
  पाटील : 
  लष्कराला त्यांची लढाईची प्रतीके, मेडल व ऐतिहासिक पाऊलखुणा याबाबत अभिमान असताे अाणि अशा गाेष्टींची ते चांगल्या प्रकारे निगराणी राखतात. त्यामुळे जय स्तंभाचा ताबा लष्कराला देण्यात यावा, ते याेग्य प्रकारे त्याचे जतन करतील.

  अॅड. प्रधान : काेरेगाव भीमा लढाईचा वादग्रस्त व संवेदनशील विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा का? 
  पाटील :
   विद्यार्थ्यांना शाळेत खरा इतिहास सांगितला पाहिजे. त्यामुळे चुकीच्या इतिहासाला ते बळी पडणार नाह

Post a comment

 
Top