0
  • Randheer Kapoors Statement On Rishi Kapoor Cancer Rumoursमुंबई - दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चांवरून कपूर परिवाराकडून स्पष्टीकरण आले आहे. ऋषी कपूर यांचे बंधू आणि अभिनेत्री करिना कपूर हिचे वडील रणधीर कपूर म्हणाले की, ऋषी यांच्या वैद्यकीय तपासण्या बाकी आहेत. यानंतरच काही म्हटले जाऊ शकते. एका इंग्रजी दैनिकानुसार, "अजून आम्हाला हे माहिती नाही की, त्यांना नेमका कोणता आजार आहे? ऋषी यांना स्वत:ला माहिती नाही की, त्यांना काय त्रास आहे?

    अजून त्यांच्या टेस्ट झालेल्या नाहीत. लोकं अशी चर्चा कशी करू शकतात की, त्यांना कॅन्सर आहे आणि तोही अॅडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचला आहे. त्यांना शांततेने टेस्ट करू द्या. जे काही समोर येईल, त्याची आम्ही सर्वांना माहिती देऊच. ते दोन-तीन दिवसांपूर्वीच अमेरिकेत पोहोचले आहेत आणि मेडिकल टेस्ट करण्याची तयारी करत आहेत. टेस्टचे परिणाम जे काही येतील, त्यावरच त्यांचे उपचार अवलंबून आहेत. परंतु, अशा प्रकारची चर्चा करणे योग्य नाही."

    तथापि, ऋषी कपूर मागच्या आठवड्यात अमेरिकेत गेले आहेत. जाण्याआधी त्यांनी ट्विट करून आपल्या बिघडलेल्या प्रकृतीची माहिती दिली होती. त्यांचा मुलगा रणबीर आणि पत्नी नीतू कपूरही त्यांच्यासोबत आहेत. ते गेल्यानंतर अशा चर्चा होत आहेत की, ऋषी यांना अॅडव्हान्स स्टेजचा कॅन्सर झाला आहे. आणि त्यावरच्या उपचारांसाठीच ते अमेरिकेला गेले आहेत. असेही म्हटले जात आहे की, मुलगी रिद्धिमा कपूर लवकरच अमेरिकेला पोहोचेल, यानंतर रणबीर परत भारतात येऊन आपल्या चित्रपटांवर पुन्हा काम सुरू करणार आहे.

    अशीही चर्चा होतेय की, ऋषी यांना ब्लड कॅन्सर असून ते लवकरच कीमोथेरेपी आणि इतर उपचार सुरू करतील. तथापि, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे, रणधीर कपूर परिवार त्यांची आई कृष्णा राज कपूर यांच्या चौथ्याची तयारीत आहेत. यामुळे ऋषीही आपल्या आईच्या अंत्यविधींमध्ये सामील होऊ शकले नव्हते.

Post a comment

 
Top