0
पुणे- वय वाढत होतं मात्र लग्न ठरत नव्हतं...या नैराश्यातून खेड तालुक्यात दोन सख्ख्या बहीण भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रंजन गणपत भोपळे (40) आणि शैला गणपत भोपळे (38) अशी मृतांची नावे असून दोघांनी विषारी औषध प्राशन करून आपले आयुष्य संपविले आहे. डेनेगाव येथे दोघे एकत्र राहत होते. राहत्या घरी दोघांनी आत्महत्या केली.

मिळालेली माहिती अशी की, शेजारीच राहणाऱ्या नातेवाईकांना बुधवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास भोपळेंच्या घरातून विषारी औषधाचा वास आला. नातेवाईकांनी घरात डोकावल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.

           

  • Brother Sister commits suicide after unable to get married in Pune

Post a Comment

 
Top