0
मुंबईत रेल्‍वेला जीवनवाहिनी संबोधलं जातं. पंरतु, हिच जीवनवाहिनी अनेकांचे जीव हिरावूनही घेते. याबाबत नुकतीच धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबईत जानेवारी २०१३ ते ऑगस्‍ट २०१८ या कालावधीत तब्‍बल १८ हजार ४२३ जणांना रेल्‍वे अपघातात जीव गमवावा लागला आहे. अर्थात गेल्या ५-६ वर्षांत मुंबापुरीत दररोज सरासरी १० जणांचा मृत्यू रेल्‍वे अपघातात झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांच्या अर्जावर मुंबई रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

Post a Comment

 
Top