0
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. शरद पवार यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये याबाबत जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या लोकसभा लढवण्याबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.


शरद पवारांनी 2019 ची निवडणूक लढवणार नाही हे 2014 सालीच स्पष्ट केले होते असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे शरद पवारांनी बैठकीत स्पष्टपणे याबाबत सांगितले असल्याचेही आव्हाड म्हणाले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी आढावा बैठक सुरू आहे. राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यावर सध्या जोर देण्यात येत आहे.

कुणी कुणाला सांगितले माहीत नाही की शरद पवार साहेब हे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत
पण @PawarSpeaks हे महाराष्ट्रातील कुठल्या ही लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवणार नाहीत

Post a Comment

 
Top