0
  • Sharad Pawar talks on Shiv Sena and bjp Alliance in Mumbaiमुंबई- शिवसेना स्वबळावर लढण्याचे म्हणत असली तरी लोकसभेसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती होईल आणि विधानसभेसाठी दोघेही वेगळे लढतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना केले. तसेच काही दिवसांपूर्वी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते, मात्र यावर बोलताना त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचे भाकीत वर्तवले.
    रफाल प्रकरणावर प्रतिक्रिया विचारता शरद पवार म्हणाले, रफाल विमाने चांगली आहेत, त्याबद्दल दुमत नाही. परंतु खरेदीच्या किमतीबाबत आक्षेप असून लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. सरकारला जनतेचा हा संशय दूर करावा लागेल. भाजप विरोधी पक्षात असताना बोफोर्सवरून सरकारला सळो की पळो करून सोडले होते. टू जी गैरव्यवहाराच्या चौकशीसाठीही भाजपने आक्रमकता दाखवत संसदेचे अधिवेशन बंद पाडले होते. त्यामुळे रफाल विमान खरेदी आरोपाबाबत विरोधक करीत असलेल्या चौकशीची मागणी त्यांना मान्य करावीच लागेल. संयुक्त संसदीय समिती नेमण्याची विरोधकांची मागणी सरकारला टाळता येणार नाही. रफाल विमान खरेदीबाबत आरोप होत असतानाच संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण फ्रान्सच्या दौऱ्यावर गेल्याबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले.
    प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमच्या एकत्र येण्यामुळे राज्यात काय फरक पडेल, असे विचारता शरद पवार म्हणाले, मुस्लिम समाज विचारपूर्वक मतदान करत असल्याने ते दोघेही एकत्र आले तरीही त्याचा राज्यात फारसा परिणाम होणार नाही.
    ईव्हीएमबाबत लवकरच बैठक 
    ईव्हीएम घोटाळ्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ईव्हीएमबाबत विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवत बॅलेट पद्धतीने मतदान घ्यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत 15 दिवसांमध्ये विरोधी पक्षनेत्यांची बैठक घेतली जात असून त्यात व्यूहरचना निश्चित केली जाईल. राज ठाकरे यांनी ईव्हीएममुळे मतदानावर बहिष्कार घालावा अशी मागणी करणारे पत्र पाठवले आहे. परंतु बहिष्काराची मागणी कोणालाही मान्य होणार

Post a Comment

 
Top