0
>महाराष्ट्र सरकारने केवळ पेट्रोलवरील व्हॅट कमी केल्याने पेट्रोल ५, तर डिझेल २.५० रुपयांनी उतरले. यामुळे तिजोरीला १२५० कोटींचा फटका बसेकेंद्राने अबकारी शुल्क १.५० रु. कमी केले, तेल कंपन्यांना १ रुपया कमी करण्यास सांगितले, भाजपध्यक्षांच्या फोननंतर १२ भाजपशासित राज्यांनी २.५० रुपये कर कमी केला, म्हणजे लिटरमागे ५ रु. फायदा
ल.

> आज : पेट्रोल: 87.44 रु. , डिझेल: 78.71 रु.
नवी दिल्ली- चार राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्क १.५० रु. कमी केले. तेल कंपन्यांनाही १ रुपये कमी करण्यास सांगितले. त्यामुळे इंधन दर अडीच रुपयांनी उतरला. यानंतर महाराष्ट्र वगळता भाजपशासित मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा, झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, काश्मीर, हिमाचल, हरियाणा, आसाम आणि उत्तराखंडने व्हॅट २.५० रुपयांनी कमी केला. त्यामुळे पेट्रोल ५ रुपयांपर्यंत स्वस्त झाले. यापूर्वी १३ ऑगस्टला दर कमी झाले तेव्हा पेट्रोल ९ पैसे व डिझेलचे दर ५ पैसे कमी झाले होते. अबकारीत कपातीची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.

जेटलींनी १८ जूनला लिहिले होते...
‘पेट्रोल-डिझेलचे शुल्क कमी करणे अशक्य आहे. १ रुपयाही कमी केला तर १४ हजार कोटींचे नुकसान होईल. माझा याला विरोध आहे.’ गुरुवारी शुल्क कमी करत म्हणाले, ‘आता सर्व राज्यांची परीक्षा आहे. त्यांनी जनतेला दिलासा द्यायला हवा.’

औरंगाबादेत एक महिन्यानंतर पेट्रोलचा दर पुन्हा आला तेव्हाच्या पातळीवर
औरंगाबादेत ३ सप्टेंबर रोजी पेट्रोल ८७.६९ रुपये होते. दरवाढ होत हा दर तब्बल ९२.४४ रुपयांवर गेला. मात्र, केंद्र व राज्य सरकारने केलेल्या करकपातीमुळे हा दर ५ अॉक्टोबरला ८७.४४ रुपयांवर येण्याची शक्यता आहे. 
- चालू अार्थिक वर्षाचे ६ महिने शिल्लक असल्याने केंद्राचा १०,५०० कोटींचा महसूल कमी होईल. 
- कंपन्यांनी १ रुपया कमी केल्याने १०,७०० कोटी फटका.

२०१४ नंतर नऊ वेळा पेट्रोलच्या शुल्कात वाढ, केवळ दाेनदाच घट
> नोव्हें. २०१४ ते जाने. २०१६ दरम्यान ९ वेळा पेट्रोलवर ११.७७ व डिझेलवर १३.४७ रुपये शुल्क वाढवले. कमी झाले फक्त ३.५ रु, केवळ दोनदा.

कर्नाटक, गुजरातेत झाला हाच प्रयोग
> १२ मे रोजी मतदान झालेल्या कर्नाटकात २४ एप्रिल ते १३ मेपर्यंत १९ दिवस दरवाढ नव्हती. नंतर ३१ मेपर्यंत १८ दिवसांत ३.७२ रुपये दरवाढ. गुजरातेत डिसेंबर १ ते १४ दरम्यान २ दिवस दरवाढ, ८ दिवस कपात. नंतर महाग.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले मोदींचे आभार
केंद्राने अबकारी कमी केल्यानंतर राज्य सरकारांनी व्हॅट कमी करावा, असे आवाहन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. याला प्रतिसाद महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत फक्त पेट्रोलवरील व्हॅट अडीच रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली.

Post a comment

 
Top