शिर्डी- शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या साेयीसाठी संस्थानकडून ११० काेटींचा दर्शनरांगेचा प्रकल्प उभारण्यात येणार अाहे. येत्या वर्षभरात पूर्ण हाेईल. त्यामुळे एक तासात दर्शनाची साेय हाेणार अाहे. विमानतळाच्या धर्तीवर सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या दुमजली दर्शनरांगेसाठी निविदा काढण्यात अाल्या असून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते भूमिपूजन हाेणार अाहे.
तब्बल २० हजार चाैरस मीटरवर हा प्रकल्प साकारला जाईल. यात दाेन्ही मजल्यांवर मिळून एका वेळेस २४ हजार भाविक दर्शनरांगेत सहभागी हाेऊ शकतील. एक तासाच्या अात भाविकांना दर्शन उपलब्ध करून देण्याचा यानिमित्ताने संस्थानचा प्रयत्न अाहे. पुढील वर्षीच्या दसऱ्यापर्यंत ही साेय उपलब्ध हाेईल. संस्थानच्या सीईअाे रुबल अग्रवाल यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला.
चहा, बिस्किटे मोफत
दुमजली दर्शनरांगेत प्रत्येक मजल्यावर ६ एसी हाॅल असतील. एका हाॅलमध्ये १५०० ते २००० भाविकांची क्षमता असेल. त्यांना चहा, काॅफी, बिस्किटे मिळतील. - रुबल अग्रवाल,
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment