- बीड- ऊसतोडणी मजुर व मुकादम संघटना बंद पाडली पाहिजे, अशा अर्थाच्या शरद पवारांच्या जाहीर वक्तव्याचा संघटनेचे नेते माजी आमदार केशवराव आंधळे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘ऊसतोडणी मजुर मुकादमांची संघटना फोडायला हा काही काँग्रेस पक्ष नाही, असा घणाघाती प्रहार त्यांनी केला आहे.
एक ऑक्टोबर रोजी बीड येथे आलेल्या शरद पवारांनी राज्यभरातील साखर कारखानदारांची डोकेदुखी ठरत असलेल्या ऊसतोडणी मजुरांच्या संपावर मतप्रदर्शन करताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे नेतृत्त्व करत असलेली ऊसतोड कामगार मुकादमांची ही संघटना बंद करा, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित ऊसतोडणी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना आवाहन केल्याची क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.यावर वक्तव्य करताना माजी आमदार आंधळे म्हणाले की, आम्ही आमच्या कष्टाच्या प्रमाणात वाढीव मजुरी मिळावी, अशा मागणीसाठी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात ऊसतोडणी मजुर-मुकादम वाहतूकदार संघटनेचे आंदोलन पुकारले असून यामुळे साखर सम्राटांचे जाणते राजे असलेल्या शरद पवारांचे धाबे दणाणले आहे असे दिसत आहे.तत्पूर्वी या प्रश्नावर कसलीही बैठक घेणार नसल्याचे शरद पवारांनी पुणे येथे स्पष्ट केल्यानंतर बीड येथील त्यांचे वक्तव्य हा संप फोडण्यासाठी पवार सरसावले असल्याचे स्पष्ट होत असले तरी त्यांचे हे स्वप्न तमाम ऊसतोडणी मजूर सामूहिक शक्ती व संघर्षशील नेतृत्वाच्या जोरावर हाणून पाडतील असेही आंधळे यांनी जाहीर केले आहे.संपाची कोंडी फोडून लाखो मजुरांना त्यांच्या हक्काचा पैसा देण्याऐवजी साखर कारखानदारांना सोईस्कर असलेल्या ऊसतोडणी मजुर संघटनांना बळ देण्यासाठी व संपात फुट पाडण्यासाठी या वयात पवार साहेब फोडाफोडी करण्यासाठी बीड येथे आले होते काय? असा सवाल आंधळे यांच्यासह गोरक्ष रसाळ, बाबासाहेब बांगर, श्रीमंत जायभाये, दत्तोबा भांगे, रामकृष्ण घुले, राणा डोईफोडे, महादेव बडे, संजय तिडके, सुखदेव सानप, सुरेश वनवे, विष्णूपंत जायभाये, तात्यासाहेब हुले, सुधाकर लांब आदींनी उपस्थित केला आहे.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या हयातीत भगवानगड दसरा मेळावा हे ऊसतोडणी मजुरांच्या एकत्रिकरणाचे ठिकाण होते. विविध वादग्रस्त घडामोडी घडुन भगवानगड दसरा मेळावा महंत नामदेव शास्त्री यांनी बंद करुन ऊसतोडणी कामगारांना भगवानगडाला दसरा बंदी केल्यानंतर गतवर्षी संत भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगाव येथे ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते.आता शरद पवार ऊसतोडणी मजुरांच्या संपाविरूद्ध मैदानात उतरल्यानंतर सुपे सावरगाव येथील आगामी दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment