वॉशिंगटन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पीएम नरेंद्र मोदी यांचे निमंत्रण धुडकावून लावले आहे. मोदींनी त्यांना भारतात प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी प्रजासत्ताक कार्यक्रमात उपस्थिती नोंदवण्यास स्पष्ट नकार दिला. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील एक पत्र राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना पाठवल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तरीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दौऱ्यासंदर्भात अधिकृत माहिती व्हाइट मधूनच येईल असे अमेरिकेतील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
ही असू शकतात कारणे...
- काही दिवसांपूर्वीच मोदींनी ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त निमंत्रण पाठवल्याची चर्चा होती. त्यावेळी अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रम्प जानेवारी महिन्यात भारत दौरा करतील याची शक्यता कमी आहे असे वर्तवले होते. ट्रम्प जानेवारी महिन्यात 'स्टेट ऑफ द युनियन' मध्ये देशाला संबोधित करणार आहेत. प्रत्येक नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या नागरिकांना हे संबोधन करण्याची परमपरा आहे.
- परंतु, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात दोनदा स्टेट ऑफ द युनियनच्या तयारी दरम्यान भारत दौरा केला होता. 2015 मध्ये त्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती. अशात ट्रम्प यांनी स्टेट ऑफ द युनियनच्या नावे भारताचे निमंत्रण नकारण्यात संबंधांमध्ये दुरावा दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी वेळोवेळी आपला चांगला मित्र असे म्हटले आहे. तरीही, रशियासोबत झालेल्या क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा करारावरून ट्रम्प नाराज आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment