0
 • नाशिक - ‘मनुस्मृती ग्रंथ, संभाजी भिडेंविरोधात बोलले तर पानसरे, दाभोलकर यांच्या प्रमाणे तुमची हत्या करण्यात येईल’, असे धमकीचे पत्र पाठवणाऱ्यांना राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चाेख प्रत्युत्तर दिले अाहे. ‘आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक पत्र प्राप्त झाले. अशा धमक्यांना मी घाबरत नाही. आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचारावर चालणाऱ्या समाजाचे चक्र उलटे फिरवणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करणारच,’ असा इशाराही त्यांनी दिला.


  नाशिकमध्ये
  अायाेजित आॅल इंडिया माळी सैनी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते म्हणाले, ‘डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दलित, वंचित घटकांना समता, न्याय दिला. आरक्षण देऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. अशी परिस्थिती असताना दिल्लीमध्ये काही लाेक संविधान जाळतात, त्यांना मात्र अटक होत नाही. दुसरीकडे, राज्यामध्ये मनुस्मृतीचे दहन करणाऱ्यांना अटक केली जाते. ज्ञानेश्वरी, तुकारामांच्या ग्रंथापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ असल्याचे संभाजी भिडे सांगतात. भिडे यांचे खरे नाव मनोहर भिडे असून बहुजन समाजाला फसवण्यासाठी संभाजी असे नाव ते लावतात. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचाराला विरोध करणाऱ्या विरोधात आम्ही कधीही शांत बसणार नाही. अनेकदा आमचे तोंड बंद करण्याचे प्रयत्न करण्यात आले. अडीच वर्ष तुरुंगात डांबले. मात्र, अशा प्रवृत्तींना आमचा कायम विरोध असेल,’ असा इशाराही भुजबळ यांनी दिला.

  ‘देशभरा
  तील माळी समाजाने संघटित होण्याची गरज आहे. केंद्र सरकारने २०२१ मध्ये ओबीसी जनगणना करण्याचे पुन्हा एकदा अाश्वासन दिले आहे. मात्र, हे आश्वासनही चुनावी जुमला ठरू नये’, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. या अधिवेशनाला खासदार सत्यपाल सिंग सैनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. ते म्हणाले, ‘समाज अाणि देशासाठी जे लाेक काम करतात हे महान असतात. समाजाच्या विकासासाठी सर्वांनी संघटित होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

  अधिवेशनातील ठराव : महात्मा जाेतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावे, दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा (३ जानेवारी) हा दिवस महिला शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, हे ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात अाले.

  महाराष्ट्र सदन ठेेकेदाराला अद्याप रुपयाही दिला नाही 
  ‘दिल्लीमध्ये अतिशय सुंदर असले महाराष्ट्र सदन तयार केला. त्यात हजारो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. प्रत्यक्षात १०० कोटी रुपयांचे टेंडर असताना त्या ठेकेदारास राज्य शासनाने अद्यापपर्यंत एकही रुपया दिलेला नाही. मात्र, ८५० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला’, असा दावा भुजबळ यांनी केला. ‘महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, लेकिन बनानेवाला अंदर’ हा शेर त्यांनी पुन्हा एेकवला, त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. या वेळी भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भुजबळांच्या सुरक्षेची पोलिस आयुक्तांकडे मागणी
  भुजबळ यांना धमकीचे पत्र मिळताच राष्ट्रवादीचे माजी अामदार जयवंत जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करुन सुरक्षेची मागणी केली. या निवेदनाला धमकीच्या पत्राची प्रतही जाेडण्यात अाली. ‘भुजबळांच्या सभांना माेठी गर्दी हाेत असताना अशा धमकीने त्यांच्या जिवाला धाेका निर्माण झाला अाहे. गृहविभागाने त्याची दखल घेवून संबंधितांवर कारवाई करावी’, अशी मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे-दराडे यांनीही पाेलिस अायुक्तालयात तक्रार दाखल करुन भुजबळ कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली. भुजबळ केवIf tells Bhide Guruji, then do your Dabholkar: Chhagan Bhujbal's letter of threat
 • ळ एका पक्षाचे नेते नसून ते नाशिकचे नेते असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले अाहे.

Post a Comment

 
Top