0
  • नांदेड - दारूच्या नशेत बापाने आपल्या स्वतःच्या दीडवर्षीय चिमुकल्या मुलीला भिंतीवर आदळून ठार केल्याची हृदयद्रावक घटना हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावात घडली आहे.


    वाघी येथील प्रभाकर इंगळे याने १६ ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास दारूच्या नशेत आपली दीड वर्षाची वर्षीय मुलगी अनू उर्फ अंजली हिला भिंतीवर आपटले. यात मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी हिमायतनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने तिला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. मुलगी मृत्युमुखी पडल्याचे कळताच प्रभाकर इंगळे हा फरार झाला आहे. या प्रकरणी मुलीची आई अर्चना इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच सोडला चिमुरडीने जीव.

    • Drunk man killed his one and half year old daughter

Post a Comment

 
Top